Crime : साडेतीन महिन्यात प्रवाशांच्या 50 तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

Crime Latest Marathi News
Crime Latest Marathi Newsesakal

नाशिक : शहरातील रिक्षा, शहर बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना लक्ष करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने हातोहात लंपास करण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये विविध पोलिस ठाण्यांमध्ये १७ गुन्हे दाखल असून, अज्ञात चोरट्यांनी तब्बल १९ लाखांचे ४५७. ५० ग्रॅम दागिन्यांवर डल्ला मारला आहे.

या तुलनेमध्ये गुन्ह्यांची उकल मात्र झालेली नाही. त्यामुळे बसस्थानकांमध्ये गर्दीचा फायदा घेत तर, रिक्षांमध्ये हातचलाखी करीत दागिने लंपास करणारी टोळी शहरात बिनबोभाट मोकाट फिरत आहेत. अन्‌ पोलिस मात्र गुन्हा नोंदविण्यापलिकडे काहीही करीत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. (3 half months thieves stole 50 tola jewelry from passengers Nashik Crime update Latest Marathi News)

शहरात प्रवासादरम्यान नागरिकांकडील सोन्याचे दागिने चोरून नेण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. गेल्या मे २०२२ ते १६ ऑगस्ट २०२२ या साडेतीन महिन्याच्या कालावधीत बसस्थानकात बसमध्ये चढताना वा रिक्षा प्रवासात प्रवास करताना दागिने चोरीला गेल्याचे शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये १७ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या १७ गुन्ह्यांमध्ये प्रवासी महिलांचा तब्बल १९ लाख ३४ हजार रुपयांचा ४५७.५० ग्रॅम वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरून नेलेले आहे.

सर्वाधिक गुन्हे हे सरकारवाडा पोलिस ठाण्यात पाच, पंचवटीत चार, मुंबई नाका-भद्रकाली या पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन तर, म्हसरुळ, अंबड व उपनगर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक-एक गुन्हे दाखल आहेत.

सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मध्यवर्ती बसस्थानक व ठक्कर बाजार बसस्थानक आहे. बसस्थानक असल्याने प्रवाशांची गर्दी असते. रिक्षाथांबेही मोठ्याप्रमाणात आहेत. अशावेळी संशयित वयोवृद्ध महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्याची संधी साधतात.

Crime Latest Marathi News
जागृती विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह दोघांना लाच घेतांना अटक

महिला चोरट्यांचा वावर

रिक्षामध्ये प्रवासी महिला हेरताना रिक्षात आधीच दोन संशयित महिला प्रवासी असतात वा, काही अंतरावर त्या रिक्षात बसतात. प्रवासा दरम्यान, प्रवासी महिलेकडील पर्स वा गळ्यातील दागिने संशयित महिला बोलण्यात गुंतवून हातोहात लंपास करतात.

दागिने चोरल्यानंतर त्या काही अंतरावर उतरून जातात. प्रवासी महिला आपल्या निश्‍चितस्थळी उतरल्यानंतर तिच्या लक्षात सदरची बाब येते. अशावेळी रिक्षाचालकही हात वर करून देतो. प्रत्यक्षात रिक्षाचालकही संशयित महिलांच्याच संपर्कातील असतो. तसेच, बसस्थानकांवरही गर्दीचा फायदा घेत संशयित महिला प्रवासी महिलांच्या गळ्यातील दागिने हातोहात लंपास करतात.

सीसीटीव्ही फेल

ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही आहेत. परंतु चुकीच्या ठिकाणी ते बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संशयित महिलांना सहज बसस्थानक परिसरात वावर असतो. दुसरीकडे पोलिसांकडूनही यासंदर्भात दाखल गुन्ह्याची उकल करण्यात उदासीनताच दिसून येते. साडेतीन महिन्यात दाखल १७ गुन्ह्यांपैकी एकही गुन्ह्यांची उकल अद्यापपर्यंत होऊ शकलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्याच भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.

पोलिस ठाणेनिहाय दाखल चोरीचे गुन्हे

सरकारवाडा - ०५, पंचवटी - ०४, मुंबईनाका - ०२, भद्रकाली - ०२, नाशिकरोड - ०१, म्हसरुळ - ०१, अंबड - ०१, उपनगर - ०१
एकूण : १७ गुन्हे
चोरीला गेलेले सोने : ४५७.५० ग्रॅम
चोरीला गेलेल्या सोन्याची रक्कम : १९ लाख ३४ हजार रुपये

"महिलांनी किमती दागिने गर्दीच्या ठिकाणी परिधान करू नयेत. प्रवासादरम्यान दागिने पिशवीत न ठेवता जवळ बाळगावेत. जेणेकरून संशयित चोरट्यांना ते लंपास करणे शक्य होणार नाही.
वृद्ध महिलांनी शक्यतो गर्दीमध्ये जाऊ नये. सावधगिरी व काळजी घेतली तर आपल्या ऐवजाचे रक्षण करणे सोपे होते." - संजय बारकुंड, पोलिस उपायुक्त, गुन्हेशाखा.

Crime Latest Marathi News
पिंपळगाव बसवंत ठरले 'सुंदरगाव'; जिल्ह्यात प्रथम पुरस्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com