Nashik : नागरीकांच्या सतर्कतेमुळे नागासह 2 सर्पांना जीवदान

Snake friend saved snakes
Snake friend saved snakesesakal

मालेगाव (जि. नाशिक) : जेऊर (ता. नांदगाव) येथे सर्पमित्र व नागरिकांच्या सतर्कतेमुळे नागासह दोन सापांना (Snakes) जीवदान मिळाले. (3 snakes were saved at jeur malegaon nashik news)

जेऊर येथील पिंटू अग्रवाल यांनी घरात दोन साप पाहिले. यात एक अति विषारी नाग होता. यामुळे त्यांचे कुटुंबिय भयभीत झाले. श्री. अग्रवाल हे सर्पमित्र पवन आंधळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत असतानाच विषारी नागाने बिनविषारी तस्कर जातीच्या सापाला अर्धे अधिक गिळले होते. सापाची वार्ता ऐकूण नजीकचे रहिवासी धावून आले. या दरम्यान सर्पमित्र पवन आंधळे हेही तेथे पोहोचले. नागरिकांचा गोंधळ सुरु असताना एकाने नागाला उचलले. तोच त्याने अर्धगिळलेल्या तस्कर सापाला सोडून पळ काढला. अग्रवाल यांच्या घरातील विषारी नागासह या सापाला श्री. आंधळे यांनी शिताफिने पकडले.

Snake friend saved snakes
तळीराम, गर्दूल्यांमुळे पोलिसांची वाढतेय डोकेदुखी

त्यानंतर दोघा सर्पांना श्री. आंधळे यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमधून सर्वात विषारी आहे. तर तस्कर सर्प प्रकारातील बिनविषारी साप आहे. राज्यात बिनविषारी तस्कर सर्वत्र आढळून येतो. अनेकांना त्याबद्दल माहिती नसल्याने नागरीक सर्पमित्रांना न बोलाविता त्यास मारतात. नागाला भक्ष न मिळाल्यामुळे त्याने बिनविषारी तस्करला गिळले असावे. गोंधळ व त्यातच एकाने नागाला हात लावल्याने त्याने तस्कराला सोडले. डिवचलेले हे दोन्ही सर्प पकडून नैसर्गिक अधिवासात सोडल्याचे श्री. आंधळे यांनी सांगितले. अग्रवाल यांच्या घरातील या दोन सर्पांच्या करामती पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

Snake friend saved snakes
पोलीस अधीक्षकांच्या भेटीने, शेतकरी सुखावला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com