Nashik Crime News : पंचवटी गोळीबार प्रकरणी 3 संशयित ताब्यात

Criminals arrested
Criminals arrestedesakal

पंचवटी (जि. नाशिक) : पेठरोडवरील फुलेनगर येथील मुंजोबा चौकात ११ मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत एक महिला जखमी झाली होती. यानंतर पंचवटी पोलिसांचे चार शोध पथके संशयितांच्या मागावर होते.

सोमवारी (ता.२०) या घटनेतील तीन संशयितांना मखमलाबाद परिसरातून ताब्यात घेतले आहे. यातील एक संशयित फरार असून, लवकरच त्यालाही अटक केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले. (3 suspects arrested in Panchvati fulenagar munjoba chowk firing case Nashik Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास उर्फ विकी विनोद वाघ (वय २५, राहणार, मारीमता मंदिराचया मागे, पाटा जवळ, पेठरोड), जय संतोष खरात व संदीप रघुनाथ आहिरे (वय ३०, दोघे राहणार रा.संदीप लॉन्द्री जवळ, शेषराव महाराज चौक, फुलेनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

या घटनेतील सर्व संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, फरार असलेला संशयित विशाल चंद्रकांत भालेराव (रा.मुंजाबाबा चौक, फुलेनगर) हा तडीपार गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार (ता.११) मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास प्रेम दयानंद महाले (वय २१) हा युवक मित्र युवराज शेळके याच्यासह गप्पा मारत उभे होते. यावेळी संशयित विशाल, संदीप, जय खरात हे हातात कोयते घेऊन आले.

त्यांच्यासोबत असलेल्या विकी वाघ याचे हातात गावठी कट्टा हाेता. यावेळी विशालने शिवीगाळ करीत प्रेम यास मारहाण करीत काेयत्याने हल्ला चढविला. प्रेमने हा हल्ला चुकवून जीव वाचविण्यासाठी घाबरून घराच्या दिशेने पळ काढला.

याच सुमारास विकी याने आपल्या कडील गावठी कट्ट्यातून प्रेमच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या गाेळीबारात प्रेमची आई यांना एक गोळी चाटून गेल्याने त्या जखमी झाल्या. तर दुसरी गोळी प्रेम याच्या मावशीच्या पाळीव कुत्र्याच्या पायाला लागल्याने हा कुत्रा देखील गंभीर जखमी झाला होता.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Criminals arrested
Sangli Crime News : माजी नगरसेवक हत्या प्रकरणी चौघांना अटक; भाजप नेताच निघाला मुख्य सुत्रधार

या घटनेनंतर पंचवटी पोलिसांचे चार शोध पथके वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सीताराम कोल्हे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत होते. पेठ तालुक्यात संशयित एका ठिकाणी लपून बसले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक प्रतीक पाटील, रोहित केदार, विलास पडोळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलोस कर्मचारी सागर कुलकर्णी, दीपक नाईक, अनिल गुंबाडे, कैलास शिंदे, महेश नांदूर्डीकर, निलेश भोईर, राकेश शिंदे, गोरक्ष साबळे, नितीन जगताप, घनश्याम महाले, श्रीकांत साळवे, नितीन पवार, अविनाश थेटे, कुणाल पचलोरे, कल्पेश जाधव, राहुल लभडे, वैभव परदेशी, अंकुश काळे, नारायण गवळी, योगेश शिंदे आदींच्या पथकाने सापळा रचून संशयित तीन जणांना अटक केली.

तर विशाल भालेराव पळून जाण्यात यशस्वी झाला. हा आरोपी देखील लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती यावेळी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.

नाशिक शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारांना पोसणारे त्यांचे गॉडफादर पोलिसांच्या नजरेतुन लांबच आहेत. त्यामुळे शहरात गुन्हेगारी कारवाया करून बहुतांश गुन्हेगार ग्रामीण भागात असणाऱ्या त्यांच्या गॉडफादर यांच्या छत्रछायेत लपून बसतात. या गॉडफादर अर्थात गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

Criminals arrested
Nashik Crime News : गोळीबाराच्या अडीच महिन्यात 3 घटना! शहरवासीयांत भीती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com