नाशिक-पुणे महामार्गावर थरार; 3 तरूण एकाच वेळी ठार

3 people death accident
3 people death accidentesakal

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर नांदुर-शिंगोटे येथे रात्री 12.30 वाजता अंगावर काटा आणणारी घटना घडली. काळाचा घाला आला आणि एकाच वेळी तिघेही तरूण एकाच वेळी ठार झाले. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

औषध कंपनीचे ३ एम आर एकाच वेळी ठार

नाशिक-पुणे महामार्गावर नांदुर-शिंगोटे येथील चीपाचा नाला या ठिकाणी रात्री 12.30 वाजता ट्रक (TS-30-T-8886) व कार (MH-15-TC1721) यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकी मधील मेडिकल औषध कंपनीचे एम आर असलेले नाशिकचे तीन तरुण जागीच ठार झाले. अपघातग्रस्त चारचाकीमधील भूषण बदान, शरद महाजन, राजेश तिवारी हे तिघेही नाशिक येथील असून पुणे येथून नाशिक कडे येत असताना नांदुर-शिंगोटे येथे हा अपघात झाला. या अपघातात तिघे ही जागीच ठार झाले.

3 people death accident
अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना दहा हजार कोटींची मदत जाहीर

पुढील तपास वावी पोलीसांकडे

अपघाताची माहिती नांदूर पोलिसांना समजताच पोलिसांनी जागेवर जाऊन तिघांना वाहनांतून बाहेर काढले व दोडी बुद्रुक शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास वावी पोलीस स्टेशनचे सागर कोते करत आहे.

3 people death accident
PM मोदींचे नवीन सल्लागार अमित खरे कोण आहेत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com