नाशिक : वाहने, टिव्ही चोरी करणारे 4 सराईत गुन्हेगार गजाआड

Theives arrest
Theives arrestesakal

नाशिक : जिल्ह्याभरात मोटर सायकल, शेतीउपयोगी ट्रॅक्टर रोटर, घरफोडी यांसारख्या चोऱ्यांनी धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांबाबत नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना गुप्त माहिती प्राप्त होताच त्यांनी धडक कारवाईचे आदेश दिले. यात 4 चार सराईतांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

चोरट्यांचे दुचाकी चोरीचे रॅकेट

या चोरट्यांकडून 9 मोटर सायकल, 8 ट्रॅक्टर रोटर व 1 एल ई डी टिव्ही हस्तगत करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा आढावा घेवुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले होते. तसेच ठाणे निहाय मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास सुरू करण्याचे आदेश दिले होते. तसेच मोटर सायकल चोरी करणारे गुन्हेगारांची सध्याचे वास्तव्याबाबत माहिती घेवून वर्दळीचे ठिकाण, बाजारपेठ, बँक, हॉस्पिटल, शाळा/कॉलेज व शहरातील मुख्य रस्त्यांवर पाळत ठेवून मोटर सायकल चोरी केले जाते व सदर चोरीच्या मोटर सायकल या कमी किंमतीत बनावट नंबर प्लेट तयार करून विक्री केल्या जातात याबाबत गोपनीयरित्या सविस्तर माहिती घेणेबाबत सुचना दिल्या होत्या.

Theives arrest
जळगाव : ॲप डाउनलोड करण्याचे सांगत सव्वा लाख लंपास

पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाप्रमाणे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथके तयार करून मिळालेल्या माहितीप्रमाणे मोटार सायकल चोरणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी मनमाड शहरात व वैजापुर तालुक्यात सापळा रचला होता. या कारवाईत मनमाड शहरातुन राजेश रामशंकर शर्मा (रा. निमच, मध्यप्रदेश), राकेश अशोक संसारे (रा. मनमाड) तर श्रीराम सोमनाथ सोनवणे (रा. वाकला ता.वैजापुर जि.औरंगाबाद), अनिल सुकदेव डांगे (रा. लोणी खुर्द ता.वैजापुर जि.औरंगाबाद) येथुन ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सुरवातील उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु पोलीस पथकाने कसुन तपास केला असता आरोपी यांनी नाशिक परिसरातील सटाणा व मनमाड येथे ट्रॅक्टर रोटर 8 विकी केले असल्याची माहिती दिली व सदर रोटर कोणाला विक्री केली आहेत याबाबत माहिती दिली. तसेच औरंगाबाद परिसरात औरंगाबाद, वैजापुर, शुर बंगला व विरगाव या विविध ठिकाणी शोरूम व घरा समोरून चोरलेल्या विविध प्रकारच्या 9 मोटार सायकल वाहने विक्री केली असल्याची माहिती दिली. सदर मोटर सायकल व ट्रॅक्टर रोटर चोरट्यांनी शोरूम व घरासमोरून चोरी केली सल्याची कबुली दिली. सदर माहितीच्या आधारे 9 मोटार सायकल, 8 ट्रॅक्टर रोटर व 1 एल ई डी टी व्ही असा 8,91,443 रुपये किंमतीचा मुददेमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Theives arrest
'मराठा समाजाला न्याय देणे ही जबाबदारी राज्य सरकारची'; पाहा व्हिडिओ

नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे सटाणा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com