संतापजनक! अवघ्या 4 महिन्यांच्या चिमुरडीची महिलेने गळा चिरुन केली हत्या : Nashik Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Nashik Crime News : संतापजनक! अवघ्या 4 महिन्यांच्या चिमुरडीची महिलेने गळा चिरुन केली हत्या

सातपूर (जि. नाशिक) : ध्रुव नगर येथील एका अज्ञात महिलेने घरात शिरून आईला बेशुध्द करत अवघ्या चार महिन्याच्या बालिकेची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (4 month old girl was killed by slitting her throat in Satpur Dhruvnagar Nashik Crime News)


हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

सातपूर येथील ध्रुव नगरमध्ये भुषण यशवंत रोकडे व युक्ता भुषम रोकडे हे कुटुंब वास्तव्यास आहे. काल सोमवारी (ता. 20) रात्री आठच्या सुमारास एक अज्ञात महीलेने घरात येत विचारपुस करण्याचा बहाणा करत युक्ता यांच्या नाकाला रूमाल लावून बेशुध्द केले व घरात असलेल्या चार महिन्याची मुलगी दुर्गुशी या बालिकेचा गळा चिरून हत्या केली.

जादू टोना सह मांत्रिक बुवा बाजी करण्याच्या प्रकाराने ही हत्या झाली आसावी, अशी चर्चा रंगली आहे. यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली असून महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेचा तपास गंगापूर पोलिस करत आहेत.