जिल्‍ह्यात कोरोनाचे 40 बळी; तर 3 हजार 25 रुग्‍णांची कोरोनावर मात

जिल्‍ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंचा आलेख वाढतच चालला आहे. रविवारी (ता.9) जिल्‍ह्यात चाळीस बाधितांचा कोरोनाने बळी घेतला.
corona update
corona updatecorona update

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंचा आलेख वाढतच चालला आहे. रविवारी (ता.9) जिल्‍ह्यात चाळीस बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. यात नाशिक शहरातील अकरा तर ग्रामीणमध्ये झालेल्‍या 26 मृत्‍यूंमध्ये निफाड तालुक्‍यातील सात जणांचा समावेश आहे. दिवसभरात तीन हजार 002 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर तीन हजार 025 रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात 33 हजार 175 बाधितांवर उपचार सुरु आहेत.

रविवारी झालेल्‍या चाळीस मृतांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील अकरा, नाशिक ग्रामीणमधील सव्वीस, मालेगाव महापालिका क्षेत्रातील तिघांचा समावेश होता. नाशिक महापालिका क्षेत्राला लागून असलेल्‍या नाशिक तालुक्‍यात गिरणारे, भगूर व देवळाली कॅम्‍प येथील प्रत्‍येकी एकाचा नाशिक ग्रामीणमधील मृतांमध्ये समावेश आहे. याशिवाय निफाड तालुक्‍यात सात, चांदवडला चार, मालेगाव ग्रामीणमध्ये तीन, सटाणा, सिन्नर आणि दिंडोरी तालुक्‍यात प्रत्‍येकी दोन, येवला, इगतपुरी व नांदगाव तालुक्‍यातील प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील एक हजार 584, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 220, मालेगावचे 115, तर जिल्‍हा बाहेरील 83 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार 022, नाशिक ग्रामीणमधील 950, मालेगावचे 29 तर जिल्‍हा बाहेरील 24 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे.

corona update
CoWin वर नोंदणी करताय? लस घेताना 'हा' Security code आवश्यक

तीन हजार 714 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित

सायंकाळी उशीरापर्यंत जिल्‍ह्यातील तीन हजार 714 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील दोन हजार 228 नाशिक शहरातील एक हजार 406 तर मालेगावच्‍या ऐंशी रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात तीन हजार 488 रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील तीन हजार 203, जिल्‍हा रुग्‍णालयात दहा, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पंधरा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये 215 तर मालेगावला 45 रुग्‍ण दाखल झाले.

corona update
वाझे प्रकरणात सरकारची बाजू सांभाळणार नाशिकचे अजय मिसर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com