Latest Marathi News | अबब... एक खड्डा बुजविण्यासाठी 45 हजार रुपये खर्च! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik

अबब... एक खड्डा बुजविण्यासाठी 45 हजार रुपये खर्च!

नाशिक : गेल्या अडीच- तीन वर्षात रस्त्यांवर साडेसहाशे कोटी रुपये खर्च केल्यानंतर आता रस्त्यांच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडू लागल्याने ठेकेदारांवर कारवाई करण्याचे सोडून बांधकाम विभागाने खड्ड्यांची डागडुजी सुरू केली आहे. तत्काळ उपाय म्हणून काम करणे अपेक्षितदेखील आहे. परंतु, एक खड्डा बुजविण्यासाठी जवळपास ४५ हजार रुपये खर्च केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वेक्षणामध्ये सहा हजार खड्डे आढळले आहेत. त्याचा विचार करता यापूर्वी आपत्कालीन निधी म्हणून तरतूद करण्यात आलेला २७ कोटी रुपयांचा निधी रस्त्यांवरच खर्च करून संकटात संधी साधण्याची किमया बांधकाम विभाग साधत आहेत. (Latest Marathi News)

शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी रस्त्यांचे डागडुजी करताना ठेकेदारांना जाब विचारणे किंवा दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. गरज भासेल तेथे ठेकेदारांना काळ्या आयोजित टाकण्याचे अधिकार शहर अभियंत्यांकडे आहे. परंतु, ठेकेदारांवर कारवाई तर सोडा उलट त्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या राजकीय पक्षाकडून केला जात आहे.

हेही वाचा: MPSC : बदललेल्या परीक्षा पद्धतीमुळे क्लास चालकांना येणार पुन्हा तेजीचे दिवस

रस्त्यांसाठी वीस ते पंचवीस टक्के कमिशन

यापूर्वी रस्ते तयार करताना तसेच डांबरीकरणांमध्ये जवळपास २० ते २५ टक्के कमिशन ठेकेदारांना द्यावे लागले. त्याचा परिणाम म्हणून रस्त्यांची गुणवत्तादेखील त्याच तोला मोलाची झाल्याचा आरोप राजकीय पक्षाकडून केला जात आहे.

छातीठोक समर्थन

पुणे महापालिका हद्दीमध्ये रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पाच हजार रुपये खर्च येत असताना नाशिक महापालिका हद्दीमध्ये ४५ हजार रुपये खर्च येत आहे. आश्चर्यकारक खर्चाचे तेवढेच छातीठोक समर्थन केले जात आहे. दोष निवारण कालावधीत ज्या रस्त्यांच्या पृष्ठभागावर खड्डे आहेत, अशा मक्तेदारांना नोटिसा बदलल्या जात असल्याचा तसेच ज्या रस्त्यांना खड्डे पडले ते सात वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा: शिंदे-फडणवीस सरकारचा खडसेंना दुहेरी धक्का; 'त्या' कारभाराची होणार चौकशी

या भागातील खड्डे बुजविल्याचा दावा

नाशिक- पुणे रोड, राणे डेअरी परिसर, अंबड परिसर, सावरकरनगर मधुर स्वीट समोरील, पपया सर्कल ते पिंपळगाव बहुला, त्र्यंबक रोडवरील बागूल ड्रायव्हिंग स्कूल ते अशोकनगर पोलिस चौकी मुख्य रस्ता, तवली फाटा, इंद्रप्रस्थ कॉलनी परिसर, पेठ रोड, ड्रीम सिटी चौक, पूर्व विभागातील दिवे बंगला, अशोका हॉस्पिटल समोरील रस्ता, सिडको दत्त चौक, पोद्दार शाळेसमोरील सोनजे मार्ग, पवननगर, उत्तमनगर, पाथर्डी- दाढेगाव रस्ता, जेजुरकर लॉन्स, महात्मानगर रस्ता, कॅनडा कॉर्नर नगर, तपोवन रोड, संत जनार्दन स्वामी पूल आणि जेल रोड भाग, अंबड- कामटवाडे रोड, अंबड एमआयडीसी, डीजीपीनगर तसेच पेठ रोड- मेहरधाम, श्री श्री रविशंकर मार्ग, त्रिमूर्ती चौक ते पवननगर रस्ता, एबीबी सर्कल, खांडे मळा आणि पंचवटीमधील मेन रोड प्रोफेसर कॉलनी.

पूर्व विभागातील वृंदावन कॉलनी, जयभवानी रोड, वीर सावरकर उड्डाणपुलावरील खड्डे, विनयनगर, अयोध्या नगरी, पवननगर, सोनवणे चौक, लेखानगर, अंबड- त्रिमूर्ती चौक लिंक रोड, त्रिमूर्ती चौक बसस्टॅण्ड, सीएट कंपनी रोड, पारिजात नगर, अंबड एमआयडीसी, अमृतधाम रिंग रोड, जेहान सर्कल, वडाळा- पाथर्डी रोड येथील साईनाथ चौफुली, पाथर्डी फाटा सर्कल, श्रीकृष्ण चौक, इंदिरानगर पोलिस स्टेशन, कलानगर, गोविंद नगर, गंगापूर रोड जहान सर्कल ते शहीद सर्कल ते विद्या विकास सर्कल, नाशिक रोड विभागातील दत्तमंदिर चौक, पुणे रोड, जेल रोड येथील तिरुपती नगर, निमाणी बसस्टॅण्ड, आडगाव- भगूर रोड, मिरची हॉटेल ते जेजुरकर लॉन्स रोड तसेच सातपूर विभागातील

हेही वाचा: उंदरांसाठी बनवला विषारी टोमॅटो मात्र टोमॅटोमुळे महिलेचा मृत्यू

एमआयडीसीतील कार्बन कॉर्पोरेशनजवळील रोड न. १७ आणि पश्चिम विभागातील विसे मळा परिसर, राजीव नगरमधील विशाखा कॉलनी, मोरवाडी गाव, पवननगर, चाणक्यनगर, गोविंदनगर, गडकरी चौक, पाथर्डी फाटा, पाथर्डी- पिंपळगाव शिव रोड, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, उंटवाडी, पेठ रोड, नामको हॉस्पिटल, ड्रीम सिटी चौक, अभियंतानगर, कामटवाडा रोड, उंटवाडीतील दत्तमंदिर रोड, नाशिक रोड भागात देवळालीमधील बुद्धविहार, पेठ रोड, नांदूर गाव.

''शहरात फक्त खड्डेच नाही तर मोठे पॅचेसदेखील आहे. त्यामुळे आकारानुसार खर्च होतो. रस्त्यांवरील खड्डे, भरताना पॅचेस, ट्रीटमेंट, खुदाई, मुरूम टाकणे, ग्रेड एक व दोनची खडी टाकणे व पावसाळ्यानंतर डांबरीकरण करणे एवढी प्रक्रिया पार पाडली जाते.'' - शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, नाशिक महापालिका.

हेही वाचा: निराधार महिलेकडून 2 हजारांची लाच घेताना तहसीलच्या शिपायाला अटक

Web Title: 45 Thousand Rupees Spent To Repair One Potholes In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top