ZP Smart Villages : जिल्ह्यातील 45 गावे होणार आदर्श; गावांचा कायापालट | 45 villages across district will become Smart through Zilla Parishad nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smart Village

ZP Smart Villages : जिल्ह्यातील 45 गावे होणार आदर्श; गावांचा कायापालट

Nashik News : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १२६ प्राथमिक शाळा स्मार्ट करण्यापाठोपाठ आता जिल्हाभरातील ४५ गावे आदर्श (स्मार्ट) होणार आहेत. (45 villages across district will become Smart through Zilla Parishad nashik news)

मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत विभागाच्यावतीने ४५ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये ३६ प्रकारची कामे करून गावाचा कायापालट केला जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरणात पालकमंत्री दादा भुसे यांनी आदर्श गावे करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेवर आधारित मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदर्श गाव (स्मार्ट गाव) ही संकल्पना तयार केली आहे.

यामध्ये प्रत्येक तालुक्यातून तीन गावांची निवड करण्यात आलेली आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ३ याप्रमाणे एकूण ४५ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्राधान्याने काही योजना राबविल्या जाणार आहेत. स्व.आर आर पाटील पुरस्कार प्राप्त गावांचा प्रामुख्याने यात समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्राथमिक स्तरावर ३६ निकषांवर काम करण्यात येत असून त्यातून आदर्श गाव संकल्पना पूर्णत्वास येणार आहे. संबंधित सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य आणि ग्रामपंचायतीशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे ग्रामपंचायत विभागातर्फे प्रशिक्षण देत, या गावांमध्ये ग्रामपंचायतींचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

या आराखड्यानुसार गावात कामे केली जाणार आहे. निवड झालेली गावे दरी, मुंगसरे, कोटमगाव (नाशिक) शिरसाठे, मोडाळे, नागोसली (इगतपुरी) वेळुंजे, काचुर्ली, अंबोली (त्र्यंबकेश्वर) कोपुर्ली बु., शेवखंडी, बोरवठ (पेठ) बुबळी, हातरुंडी, म्हैस खडक (सुरगाणा) करंजवण, कोल्हेर, गोंडेगाव (दिंडोरी) सुळे, नांदुरी,

मेहदर (कळवण) पिंपळदरे, रातीर, नवे निरपूर (बागलाण), वरवंडी, खालप, माळवाडी (देवळा), राजदेरवाडी, हिरापूर, नन्हावे (चांदवड), निळगव्हाण, बेळगाव, मुंगसे (मालेगाव), बोराळे, श्रीरामनगर, भालुर (नांदगाव), महालखेडा, सायगाव, एरंडगाव खु (येवला), थेरगाव, आहेरगाव, साकोरे मिग (निफाड), वडांगळी, चिंचोली, दातली (सिन्नर).

टॅग्स :NashikZP