नाशिक जिल्‍ह्यात कोरोनाचे 47 बळी; 4 हजार 110 पॉझिटिव्‍ह

जिल्‍ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत घट होत असली तरी कोरोना बळींची संख्या चिंताजनकरित्‍या वाढत चालली आहे.
corona update
corona updatecorona update

नाशिक : जिल्‍ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत घट होत असली तरी कोरोना बळींची संख्या चिंताजनकरित्‍या वाढत चालली आहे. बुधवारी (ता.5) जिल्‍ह्यात 47 बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. दिवसभरात चार हजार 110 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर चार हजार 279 रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. सद्य स्‍थितीत जिल्‍ह्‍यात 33 हजार 837 बाधितांवर उपचार सुरु आहेत.

बुधवारी सर्वाधिक दोन हजार 087 कोरोना बाधित नाशिक ग्रामीणमध्ये आढळले. नाशिक महापालिका क्षेत्रात एक हजार 892, मालेगाव महापालिका क्षेत्रात 89, तर जिल्‍हा बाहेरील 42 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार 673, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 490, मालेगावचे 46, तर जिल्‍हा बाहेरील सत्तर रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. 47 मृतांमध्ये नाशिक शहरातील सतरा, नाशिक ग्रामीणमधील चोवीस तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील सहा बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे.

corona update
ग्राउंड रिपोर्ट : नाशिक-जळगाव सीमेवर ‘आओ जाओ घर तुम्हारा’!

सायंकाळी उशीरापर्यंत जिल्‍ह्‍यातील पाच हजार 946 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक तीन हजार 983, नाशिक शहरातील एक हजार 677 तर मालेगाव क्षेत्रातील 286 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा कायम होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविगीकरणात तीन हजार 620 रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील तीन हजार 341 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात तीन, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सतरा रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील 216 तर मालेगाव क्षेत्रातील 43 रुग्‍णांचा समावेश आहे.

corona update
नाशिकमध्ये सभागृहनेता सतीश सोनवणे यांच्या कार्यालयाची तोडफोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com