
Nashik Corona Update : जिल्ह्यात कोरोनाचे 50 सक्रिय रुग्ण
नाशिक : कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असताना दीर्घ कालावधीपासून नाशिकमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या घटलेली होती.
परंतु गेल्या काही दिवसांपासून नव्याने कोरोनाबाधित अढळून लागल्याने सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २०) जिल्ह्यात पन्नास कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होते. (50 active patients of Corona in district Nashik Corona Update news)
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
सोमवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील बारा, नाशिक ग्रामीण भागातील आठ, तर जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दुसरीकडे दिवसभरात १९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली.
असे असले तरी सक्रिय रुग्णसंख्येत दोनने वाढ झाली असून, ही संख्या पन्नासपर्यंत पोचली आहे. सध्या नाशिक महापालिका क्षेत्रात २४, नाशिक ग्रामीणमध्ये २२, जिल्हाबाहेरील चौघा कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
मालेगाव महापालिका क्षेत्रात सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही. सध्या चाचण्या घटल्या असून, पॉझिटिव्हीटी रेटमध्ये वाढ झालेली आहे. सोमवारी नाशिक क्षेत्राचा पॉझिटिव्हीटी दर ७.९५ टक्के, नाशिक ग्रामीणचा पॉझिटिव्हीटी दर ६.३० टक्के राहिला.