आधार लिंकला 50 हजार मतदारांचा प्रतिसाद

Linking Of aadhar & voter ID latest marathi news
Linking Of aadhar & voter ID latest marathi newsesakal

नाशिक : निवडणूक आयोगाने मतदार याद्या निर्दोष करण्यासाठी सुरु केलेल्या उपक्रमाला पन्नास हजाराहून अधिक मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. एक तारखेपासून सुरू झालेल्या मोहिमेला अवघ्या पंधरा दिवसात हा प्रतिसाद मिळाला आहे. (50 thousand voters response to Aadhaar link Nashik Latest Marathi News)

नाशिक जिल्ह्यात ४६ लाख ११ हजार मतदार असून त्यापैकी पंधरा दिवसात ५० हजार ७९२ मतदारांनी त्यांच्या मतदार कार्डाला आधार कार्डाचे क्रमांक लिंक केले आहे. स्वयंस्फूर्तीने व ऐच्छिक स्वरूपाची ही मोहीम असली तरी, त्याला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद आहे. जिल्ह्यात दिवसाला दीड हजार ते सोळाशेच्या आसपास मतदार स्वतःहून त्यांच्या मतदार कार्डाला आधार कार्ड लिंक करत असल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

येवल्याचे मतदार आघाडीवर

एक तारखेपासून सुरु झालेल्या या मोहिमेत सर्वाधीक येवला मतदार संघात प्रतिसाद लाभला आहे. येवला मतदार संघात सर्वाधीक १२०६१ मतदारांनी त्यांचे मतदार कार्ड आधार कार्डाशी लिंक केले आहेत.

सर्वात कमी नाशिक पश्चिम मतदार संघात म्हणजे अवघ्या ९१७ मतदारांनी त्यांचे मतदार कार्ड आधार कार्डाशी जोडले आहे. त्यानंतर मालेगाव (बाह्य) मतदार संघात अवघ्या ९८२ मतदारांनी त्यांचे कार्ड लिंक केले आहेत.

Linking Of aadhar & voter ID latest marathi news
Crime Update : पिंपळगाव बसवंतमध्ये चोरट्यांनी दुकाने फोडली

मतदार संघ निहाय आधार लिंक
मतदार संघ एकूण मतदार आधार लिंकसाठी अर्ज

नांदगाव ३१२३८६ १५९७
मालेगाव (मध्य) ३०१३२२ २०५४
मालेगाव (बाह्य) ३३६८८७ ९८२
बागलाण २७२५४० १४१४
कळवण २७४६५५ ४८४१
चांदवड २८२८१८ ६३७७
येवला २९८७४८ १२०६१
सिन्नर २९७५७४ ३९६५
निफाड २८०६९३ ११३४
दिंडोरी ३०८७४२ ८१४७
नाशिक पूर्व ३६९६८८ १२४४
नाशिक मध्य ३२२५०४ १५८५
नाशिक पश्चिम ४२३२४४ ९१७
देवळाली २६५०६९ १७७७
इगतपुरी २६२१६३ २६९७
एकूण ४६११०३३ ५०७९२

"मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार कार्डाला आधार लिंक करण्याचा उपक्रम सुरु आहे. अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी होऊन जिल्ह्यातील आधार लिंकची टक्केवारी वाढवावी." - गंगाथरण डी., जिल्हाधिकारी, नाशिक

Linking Of aadhar & voter ID latest marathi news
जागृती विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह दोघांना लाच घेतांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com