Nashik Crime News : कमी व्याजदराने कर्जाच्या आमिषाने 6 लाखांना गंडा

nashik crime news
nashik crime newsesakal

Nashik Crime News : दीर्घ मुदतीसाठी कमी व्याजदरात कर्ज काढून देतो असे सांगून एका फायनान्स कंपनीच्या नावाने मंजुरीचे पत्र देऊन कर्जाच्या प्रोसेसिंग फी पोटी ६ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे माजी अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप रामराव शिंदे (६८) यांची याप्रकरणी फसवणूक झाली आहे. (6 lakhs extorted by lure of low interest rate loan Nashik Crime News)

श्री. शिंदे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात चार संशयितांच्या विरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज वामन शिंदे, सर्वेश मनोज शिंदे (दोघे रा. ऋषिकेश हाईट्स, महात्मानगर (नाशिक), युवराज हरीशकुमार वर्मा, सरताज मिर्झा ( दोघे रा. प्लॉट नंबर ६०६, क्षितिज अपार्टमेंट, अंधेरी स्पोर्टक्लब वीरा देसाई रोड, अंधेरी वेस्ट) अशी फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत.

त्यांनी दिलीप शिंदे यांना त्यांचे मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील हॉटेल गुलमोहर रेसिडेन्सीच्या विस्तारीकरणासाठी ३ कोटी रुपये कर्ज दीर्घ मुदतीसाठी व कमी व्याजदरात देतो असे सांगून विश्वास संपादन केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

nashik crime news
Crime News : शंभु सावरगावातील ‘त्या’ मुलीचा खून

त्यानंतर युवराज हरीशकुमार वर्मा आणि सरताज मिर्झा यांच्या स्वाक्षरीचे फॉर्च्युन बुलियन इंडिया फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, अंधेरी मुंबई या नावाचे अॅप्रुव्हलचे पत्रही दिले. बदल्यात कर्जाची प्रोसेसिंग फी म्हणून शिंदे यांच्याकडून २० मार्च २०२१ ते २२ एप्रिल २०२३ पर्यंत वेळोवेळी ६ लाख रुपये घेतले.

मात्र कर्ज मंजूर केले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने शिंदे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ४ संशयितांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शामराव निकम तपास करीत आहेत.

nashik crime news
Mumbai Crime : खळबळजनक! महिला इंस्पेक्टरचा मृतदेह अढळला; घरातून दुर्गंधी आल्याने घटना उघड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com