esakal | नाशिकमध्ये १५ दिवसांत ६७ हजार नवे कोरोनाबाधित; मृत्युदरात वेगाने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates.

नाशिकमध्ये १५ दिवसांत ६७ हजार नवे कोरोनाबाधित; मृत्युदरात वेगाने वाढ

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : जानेवारीपर्यंत उतरणीला लागलेल्या कोरोना संसर्गाने फेब्रुवारीत उसळी घेताना गेल्या वर्षाचे विक्रम मोडीत काढले आहेत. प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात पंधरा दिवसांत ६७ हजार ३४६ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, यात ४२४ नागरिकांचा बळी गेला आहे. मृत्यूचे प्रमाण शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक आहे.

गेल्यावर्षी मार्चमध्ये ग्रामीण भागात, तर शहरी भागात एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. ऑक्टोबरपर्यंत कोरोना संसर्गाचा वेग चढता होता. त्यानंतर जानेवारीअखेर कोरोना उतरणीला लागल्याने सर्व व्यवहार पूर्ववत झाले. व्यवहार पूर्ववत होत असताना निष्काळजी समोर आली व त्यातून कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात तयार झाली. फेब्रुवारीच्या अखेरीस रुग्णांची संख्या वाढू लागली. मार्चच्या अखेरपर्यंत एक लाख ८१ हजार ५२२ कोरोना रुग्णांची संख्या पोचली. एप्रिलमध्ये मात्र कोरोनाचे थैमान अधिक वाढले. १५ एप्रिलपर्यंत दोन लाख ४८ हजार ८६८ पर्यंत ति संख्या पोचली. पंधरा दिवसांत शहर व ग्रामीण भागात ६७ हजार ३४६ रुग्ण वाढले आहेत.

हेही वाचा: कोरोना जाईना, लग्न ठरेना! नोकऱ्या गमावलेल्या ग्रामीण भागातील तरुणांची व्यथा

कोरोनाची पंधरा दिवसांची स्थिती

- शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मृत्युदराचे प्रमाण अधिक

- ग्रामीण २२१, शहर १६६, मालेगाव- १९ तर जिल्ह्याबाहेरील अठरा जणांचा मृत्यू

- जानेवारीत कोरोनामुक्तीचे प्रमाण ९७ टक्के होते

- सद्यःस्थितीत जिल्ह्यात ८३.३७ टक्के कोरोनामुक्तीचे प्रमाण

- शहरात ८४.८१ टक्के कोरोनामुक्तीचे प्रमाण

- अद्यापही सात हजार ६४७ अहवाल प्रलंबित

- ग्रामीण भागात चार हजार १६२, शहरात दोन हजार ९०९, मालेगावचे ५७६ अहवाल प्रलंबित

हेही वाचा: पुन्हा तीच व्यथा! आईच्या मृत्यूनंतर 7 दिवसांनी मुलाचीही अंत्ययात्रा