Nashik Accident News : भाजीपाल्याची पिकअप उलटून शेतकरी जखमी; तिघे गंभीर | 7 farmers were seriously injured due to pickup overturned nashik accident news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 accident

Nashik Accident News : भाजीपाल्याची पिकअप उलटून शेतकरी जखमी; तिघे गंभीर

Nashik News : कळवण- वणी रस्त्यावरील मांदाणे फाट्यानजीक भाजीपाल्याची वाहतूक करणारी पिकअप पलटी होऊन सात शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारांनंतर नाशिकला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. (7 farmers were seriously injured due to pickup overturned nashik accident news)

शनिवारी (ता. २९) दुपारी साडेचारच्या सुमारास कासुर्डे व भाकुर्डे (ता. कळवण) येथील शेतकऱ्यांचा शेतीमाल नाशिक बाजार समितीत विक्रीसाठी नेत असलेल्या पिकअपने (एमएच ४१, अेयु ५४६४) वणी-नांदूरी रस्त्यावरील मांदाणे फाट्यानजीक हेलकावा घेतला. या वेळी क्लिनर बाजूला बसलेल्या शेतकऱ्याने घाबरुन दरवाजा उघडत पिकअपमधून उडी घेतली.

त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप पलटी झाली. यात शेतीमालासह पिकअपमध्ये बसलेले सुनील रामदास जगताप (वय ३०), राहूल परशराम गायकवाड (वय २५), संदिप सुरेश जाधव (वय २३), गणेश तुकाराम जगताप (वय २५, चौघेही रा. भाकुर्डे), योगेश नामदेव बागूल (वय १८), कमलेश रमेश गायकवाड (वय १९, रा. कासुर्डे) व राजाराम आहेर (वय ५५, रा. कळमादे) हे जखमी झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांना येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सुनील जगताप, योगेश बागूल व राजाराम आहेर हे गंभीर जखमी असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी वणी पोलिसांत पिकअप चालकाविरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikFarmeraccident