
Gram Panchayat Bypoll Election: ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत 70 टक्के मतदान
Gram Panchayat Bypoll Election : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्य आणि थेट सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज गुरूवारी (ता.१८) ठिकठिकाणी उत्साहात मतदान झाले. यासाठी सरासरी ७५ ते ८० टक्के मतदान झाले आहे. (70 percent voting in Gram Panchayat Bypoll election nashik news)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जिल्ह्यातील ३४ ग्रामपंचायतींत रिक्त पदांच्या निवडणुका होत आहेत. साधारण विविध गावातील ४१ जागांसाठी मतदान होत आहे. त्यात २ सरपंचपदासाठी तर ३९ सदस्यपदासाठी ४३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरु आहे.
रिक्त जागांसाठी जिल्हाभरातील २० हजार ३६२ मतदार संख्या आहे. त्यात महिला मतदार ९ हजार ६६३ तर पुरुष मतदारांची संख्या १० हजार ६९९ आहे. जिल्हाभरात सकाळी साडे सातपासून मतदानाला सुरुवात झाली.
सकाळी साडे अकरापर्यत ३४८६ महिला आणि ४३२१ पुरुष याप्रमाणे एकूण ७८०७ मतदारांनी (३८.३४ टक्के) हक्क बजावला होता. दुपारी साडे तीनपर्यत ५ हजार ८२१ महिला ६ हजार ८८३ पुरुष याप्रमाणे १२ हजार ७०४ मतदारांनी (६२. ३१ टक्के) हक्क बजावला.