
Nashik Crime News : ओम्नी-टेम्पोच्या धडकेत 8 प्रवासी जखमी
वाडीवऱ्हे (जि. नाशिक) : मुंबई- आग्रा महामार्गावर जिंदल कंपनीजवळ मारुती ओम्नी व टेम्पो अपघातात आठ प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी (ता. १७) दुपारी साडेतीनला हा अपघात झाला. (8 passengers injured in collision with Omni Tempo nashik news)
नाशिककडुन घोटीकडे जात असलेल्या ओम्नीला (एमएच १५, डीएम ५६४७) पाठीमागुन येत असलेल्या टेम्पोने (एमएच ४३, एफ ७४८६) धडक दिली. यात ओम्नीमधील शिवाजी पंडित डगळे (वय २५), सुनिता शिवाजी डगळे (वय २६), जिजाबाई पंढरी डगळे (वय ४०, रा. लहांगेवाडी),
प्रमोद लक्ष्मण अहिरे (वय ४०), निर्मला प्रमोद अहिरे (वय ३०), जयदीप प्रमोद अहिरे (वय १३, रा. सातपूर, नाशिक), दयाराम शंकर मोहिते (वय ५०, रा. खंबाळे आश्रम शाळा), नसीम मोहम्मद शेख (वय ४०, रा. घोटी) हे आठ प्रवासी जखमी झाले आहेत.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
त्यापैकी तीन प्रवासी गंभीर जखमी आहे. आपघाताची माहीती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या गोंदे फाटा येथे कार्यरत असलेल्या मोफत रुग्णवाहिका सेवेने तातडीने रुग्णांना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.