नाशिक : घरफोडीत 95 हजाराचा ऐवज लंपास | Crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

95000 rs items were stolen by burglary in Nashik

नाशिक : घरफोडीत 95 हजाराचा ऐवज लंपास

नाशिक रोड : बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून सुमारे 95 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रक्कम लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Burglary in Nashik)

अबब! केव्हढा ऐवज लंपास केला चोरट्याने...

यासंदर्भात दिपक पवन कुमार सूद रा. फ्लॅट नंबर बी 11 कॉस्मो सोसायटी सिद्धार्थ हॉटेल समोर नाशिक पुणे रोड नाशिक यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांचा फ्लॅट बंद असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला अन् बेडरूममधील कपाटाच्या ड्रावरमधील सात हजार रुपये रोख, 30 हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉइन, 15 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, 9 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 9 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स, एकवीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, पंधराशे रुपये किमतीचे घड्याळ, चारशे रुपये किमतीचे टायटन घड्याळ, आठशे रुपये किमतीचे सोनाटा कंपनीचे घड्याळ, पंधराशे रुपये किमतीचे स्पीकर असा ऐवज चोरून नेला. या सर्व वस्तू चोरट्याने चोरुन नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे दरम्यान या प्रकरणी उपनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: देवळाली गावातील क्रेडिट सोसायटीत 46 लाखाचा अपहार

हेही वाचा: नाशिक : सोन्याची बिस्कीटे असल्याचे भासवून लुटमार करणारी टोळी गजाआड

Web Title: 95000 Rs Items Were Stolen By Burglary In Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikCrime News
go to top