esakal | "बोलली नाही तर बदनामी करीन!''...तो करायचा लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य

बोलून बातमी शोधा

girl abuse.jpg

याच प्रकरणी रविवारी (ता. 16) दुपारी पावणेबाराला पीडिता त्यास निमाणी बस स्थानक येथे समजावून सांगत होती. त्या वेळी संशयिताने तिचा हात पकडून लग्न नाही केले तर माझ्या जीवाचे काहीही करून घेईन. अशी दमदाटी करीत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. 

"बोलली नाही तर बदनामी करीन!''...तो करायचा लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : वर्षभरापासून पीडित युवतीला 'माझ्यासोबत लग्न नाही केले तर ठार करीन', अशाप्रकारची धमकी देत संशयित मानसिक व शारिरीक त्रास देत होता. रविवारी तिला निमाणी बसस्थानकावर गाठून त्याने दमदाटी करत विनयभंग केल्याची घटना घडली. 

असा आहे प्रकार
 
रितेश पवाल (पाटील) (वय 25, मूळ रा. राणीचे बांबरुड, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, मार्च 2019 पासून संशयित पीडितेचा पाठलाग करीत होता. 'माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्याशिवाय नाही राहू शकत, तू सोडून गेली तर ठार करीन.' अशाप्रकारची धमकी देत तो तिला त्रास देत होता. तसेच, वारंवार "बोलली नाही तर बदनामी करीन', असे संदेश पाठवायचा. वारंवार बदनामीची धमकी देणाऱ्या संशयिताला पीडिता समजावून सांगत असताना संशयिताने लग्न नाही केले तर ठार मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. तसेच, पीडितेच्या सोशल मीडिया अकाउंटवरही बारकाईने लक्ष ठेवून तिचा पाठलाग करायचा.

हेही वाचा > शेतकऱ्यांच्या लेकरांनी बनविले स्मार्ट मका पेरणीयंत्र!

हेही वाचा > बेपत्ता बांधकाम अभियंत्याचा मृतदेह गांधी तलावात!

दमदाटी करीत लज्जा उत्पन्न होईल त्याचे कृत्य

याच प्रकरणी रविवारी (ता. 16) दुपारी पावणेबाराला पीडिता त्यास निमाणी बसस्थानक येथे समजावून सांगत होती. त्या वेळी संशयिताने तिचा हात पकडून लग्न नाही केले तर माझ्या जीवाचे काहीही करून घेईन. अशी दमदाटी करीत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > 'तक्रार मागे घे नाहीतर!'...दोन वर्षाचा वाद 'त्याच्या' जीवावर