Nashik News : 48 तासात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा सामुदायिक आत्मदहन

Farmers Agitation
Farmers Agitationesakal

Nashik News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनींच्या जप्ती व लिलावाची प्रक्रिया थांबविण्यात यावी. येत्या ४८ तासात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे यांनी दिला आहे. (Accept farmers demands within 48 hours or community self immolation Nashik News )

निफाड तहसील कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसापासून शेतकरी संघर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाठिंबा दर्शविला आहे. मनसे जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे, तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे यांच्या उपस्थितीत सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हा उपाध्यक्ष सांगळे म्हणाले, जिल्हा बँक तसेच जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांनी शेतकरी विरोधी संगनमत करून शेतकऱ्यांना अंधारात ठेवून घाईघाईने एकतर्फी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनीवर १०१ /१०७ व १००/८५ अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवाई कमी वेळात करण्यात आल्या.

शेतकऱ्यांना त्यांची बाजू मांडण्यास वेळ दिला गेला नाही. शेतकरी हा अनेक संकटांचा सामना करत असून शेतकऱ्यांकडे असलेल्या कर्जाच्या मुद्दल रकमेच्या दहा ते पंधरा पट व्याजाच्या रकमा वाढल्याने शेतकरी हा कर्ज भरण्यास समर्थ राहिला नाही.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Farmers Agitation
Nashik News : गांधी तलावाजवळ फुलली चौपाटी; ज्येष्ठांसह तरुणाईलाही पडतेय भुरळ!

अशा कठीण प्रसंगात जिल्हा बँकेने जमीन जप्ती व लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक कर्जदार शेतकरी व त्यांचे कुटुंब तणावग्रस्त असून भविष्यात त्यांच्या जीवितास बरे वाईट झाल्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला.

सुधाकर मोगल, भगवान बोराडे, दत्तात्रय सुडके, विनायक घोलप, दत्ता गवळी, अब्दुल शेख, संजय पाटोळे, उमाकांत शिंदे, नवनाथ गावले, मोतीराम पाटील, केशव पानगव्हाणे, बाळासाहेब सुरवाडे, दिलीप निकम, बाळू ढोमसे, राजेंद्र निफाडे, शामराव निफाडे, बारकू ढोमसे, केदाबाई पानगव्हाणे, एकनाथ चौधरी, विष्णू होळकर, दिलीप पानगव्हाणे, अण्णासाहेब अनारसे,

कारभारी कोल्हे, राजेंद्र आहेर, संजय झाल्टे, हेमंत जाधव, सोमनाथ झाल्टे, खंडेराव मोगरे, केशव कदम, संजय म झाल्टे, नाना पथाडे, नाना गाजरे, सयाजी घोलप, निवृत्ती गायकवाड, नारायण आहेर, अमोल आहेर, एकनाथ चौधरी, गंगाधर शिंदे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Farmers Agitation
Unseasonal Rain Damage : सिन्नर तालुक्यात 366 हेक्टरमध्ये नुकसान; रब्बीसह भाजीपाला पिकांचा सहभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com