esakal | इगतपुरीत रेल्वेच्या डब्याला आग; जीवितहानी नाही
sakal

बोलून बातमी शोधा

train caught fire

इगतपुरीत रेल्वेच्या डब्याला आग; जीवितहानी नाही

sakal_logo
By
पोपट गवांदे

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी येथील स्टेशन जवळील रेल्वे यार्डात मालगाडीसह इतर रेल्वे गाड्या चेक करण्यासाठी उभ्या केल्या जातात. शुक्रवार ( ता.९ रोजी ) दुपारी तीनच्या सुमारास या रेल्वे यार्ड परिसरात उभ्या असलेल्या दुर्घटना सहायता राहत गाडीच्या डब्याला अचानक आग लागली.


घटनेची माहिती समजताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व रेल्वे लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचारीं तातडीने आग विझवण्याचे काम चालू केल्याने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.या घटनेचा रेल्वेच्या वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नसुन रेल्वे एक्सप्रेसची वाहतुक सुरळीत सुरू होती. (accident relief train caught fire at Igatpuri)

हेही वाचा: नाशिकमध्ये विवाहात मास्क, सॅनिटायझरसोबत थर्मामीटर सक्तीचे

loading image