Nashik News : सेवानिवृत्त शिक्षण अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

baban Dukare
baban Dukareesakal

Nashik News : सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सिन्नर पंचायत समितीचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी बबन विठ्ठल डुकरे ७३ यांचा अपघाती मृत्यू झाला. (Accidental death of retired education officer Nashik News)

वावी येथे मंगळवारी आठवडे बाजार असल्याने श्री. डुकरे हे दुचाकीवरून एकटेच पांगरी येथून वावीला येत होते. वावी येथील साई भक्त निवास समोर ते महामार्ग ओलांडत असताना शिर्डी बाजू कडून भरधाव येणाऱ्या तवेरा कार ने दुचाकीला धडक दिली.

या अपघातात डांबरी रस्त्यावर फेकले जाऊन श्री. डुकरे यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर स्थानिक व्यवसायिकांनी धाव घेत खाजगी रुग्णवाहिकेतून श्री. डुकरे यांना सिन्नरला उपचारासाठी पाठवले. मात्र, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

baban Dukare
Jalgaon Crime News : गोड बोलत सहा वर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंग, आईने आरडाओरड करताच..

वावी येथे साईभक्त निवास समोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थानिक वाहनांना ये-जा करण्यासाठी जागा सोडली आहे. मात्र उड्डाण पुलावरून उतरणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडतात.

या ठिकाणी दोनही बाजूंकडून महामार्गावर वाहनांना वेग नियंत्रित करणारी यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणे आवश्यक आहे. श्री. डुकरे यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. सिन्नर पंचायत समितीतीतून सेवा निवृत्त झाले होते.

baban Dukare
Nashik Crime News : दातली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com