Nashik News : नामपूरच्या तरुणाचा अपघातात मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Nashik News : नामपूरच्या तरुणाचा अपघातात मृत्यु

नामपूर (जि. नाशिक) : नामपूर-मालेगाव रस्त्यालगत मोटारसायकल आणि मालवाहू चारचाकी छोटा हत्ती यांच्यात रविवारी (ता. १) झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. (Accidental death of young man from Nampur Nashik News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik News: गौणखनिज प्रकरणाच्या तपासाची दिशा अजूनही ठरेना!

येथील पेट्रोलपंप परिसरातील बँक कॉलनीतील रहिवासी इलेक्ट्रिक व्यावसायिक प्रकाश कृष्णा कट्यारे असे मयत तरुणाचे नाव असून, याबाबत वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. नामपूर येथील कापड व्यावसायिक मुन्ना खानापुरे आणि मयत प्रकाश कट्यारे आपल्या मोटरसायकलने साहित्य खरेदीसाठी मालेगावला गेले होते.

तेथून परतत असताना अजंगकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात हलविले. परंतु प्रकाश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे निधन झाले. मुन्ना खानापुरे यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मालेगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात सोमवारी (ता. २) त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. मोसम प्रतिष्ठानचे दीपक कट्यारे यांचे ते लहान बंधू होत.

हेही वाचा: Nashik News | रासाका ऊस उत्पादकांना देणार एकरक्कमी रक्कम : रामभाऊ माळोदे

टॅग्स :NashikAccident Death News