Nashik Crime News : भावजयीच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

Court Order
Court Orderesakal

नाशिक : मद्याच्या आहारी गेलेल्या आरोपीला भाऊ व त्याच्या पत्नीने वाद घातला. त्या रागातून आरोपीने भावजयीच्या छातीत चाकूने भोकसून खून केला तसेच, भावावरही चाकूने वार करून जखमी केले.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सदरची घटना २ जून २०२२ रोजी घडली होती. (Accused gets life imprisonment in case of brother wifes murder Nashik Crime News)

अनिल पांडुरंग पाटील (३७, रा. मोरे मळा, हनुमान वाडी, पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे. तर, यात ज्योती सुनील पाटील या मयत झाल्या होत्या. सुनील पाटील यांच्या फिर्यादीनुसार, मोरे मळा परिसरात पाटील कुटूंबिय राहत होते. काहीही कामधंदा न करणारा आरोपी अनिल यास मद्याचे व्यसन होते.

२ जून २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास अनिल कपडे काढून जमिनीवर झोपलेला होता. त्यामुळे भावजयी ज्योती पाटील व भाऊ सुनील यांनी आरोपी अनिलला बडबड करीत रागावले. त्याचा राग आल्याने अनिलने शिवीगाळ करीत किचनमधून चाकू आणला व ज्योती यांच्या छातीत भोकसला. वर्मी घाव बसल्याने ज्योती गंभीररित्या जखमी झाल्या.

त्यांना वाचविण्यासाठी सुनील धावला असता अनिलने त्यांच्यावरही हल्ला केला. यात सुनील जखमी झाले. घटनेनंतर अनिल फरार झाला होता. ज्योती यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Court Order
Pune Crime News: क्रूरतेचा कळस! आईनेच केली ४ वर्षीय पोटच्या पोरीची निर्घृण हत्या

याप्रकरणी सुनील पाटील यांच्या फिर्यादीनुसार, पंचवटी पोलिस ठाण्यात अनिलविरोधात खुन, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक भगत व ए. एस. साखरे यांनी तपास करीत अनिल यास अटक केली.

तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भीडे यांनी युक्तीवाद करीत १३ साक्षीदार तपासले. यात परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांच्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी अनिल यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

Court Order
Dhule Crime News : प्लॅस्टिक कचऱ्याआडून गुटखा तस्करी; धुळे एलसीबीची कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com