Nashik News: विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अडविल्यास कारवाई; शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांचे शाळांना आदेश

Pravin patil
Pravin patilesakal

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून इयत्ता बारावी व दहावीच्या परीक्षा लवकरच होणार आहे. मात्र, शाळांकडून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अडवले जात असल्याची तक्रार नाशिक पॅरेट्स असोसिएशनने शिक्षणाधिकार्यांकडे केली आहे.

त्याआधारे हॉल तिकीट अडवणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी दिले आहेत. (Action if student hall ticket blocked Education Officer Praveen Patil orders to schools nashik news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Pravin patil
Nashik News : पाठशिवणीच्या खेळात वाघाची मावशी अन् बिबट्याची थेट विहिरीत उडी!

कायम विना अनुदानित, विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित खासगी शैक्षणिक संस्था शुल्क वसुलीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अडवितात. तसेच शुल्क वसुलीसाठी विद्यार्थ्यांचे मार्कशीट व दाखले अडविल्याने कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नाशिक पँरेंटस असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश साळुंखे यांनी निवेदन सादर केले आहे.

त्याआधारे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट अडवून परीक्षेपासून वंचित ठेवू नये. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे मार्कशीट व शाळा सोडल्याचे दाखले शाळांकडे प्रलंबित आहेत, अशा शैक्षणिक संस्थांनी कारवाई करावी.

कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या बाबत सर्व शाळांना आवाहन करण्यात आलेले आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Pravin patil
Sanjay Raut | नाशिकसह राज्यात 2024 ला भगवा फडकवू : संजय राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com