Nashik Bribe Crime: येवल्यात पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांसह कार्यक्रम अधिकाऱ्यावर लाच प्रकरणी कारवाई

bribe case
bribe caseesakal

Nashik Bribe Crime : गाय गोठ्याच्या फायलीवर सही करण्यासाठी येथील पंचायत समितीतील ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांसह कंत्राटी कार्यक्रम अधिकार्याला लाच घेण्याचे मान्य केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. त्यांच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

या प्रकरणातील तकारदार यांचे गाय गोटा प्रकरणांच्या तीन फाईलवर सही करून देण्याचे मोबदल्यात कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकारी लहु सपकाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन फाईलचे प्रत्येकी ५०० रूपयाप्रमाणे १५०० रूपये व विस्तार अधिकारी आनंदा रामदास यादव यांनी तीन फाईलचे प्रत्येकी ५००रूपयाप्रमाणे १५०० रूपये लाचेची मागणी केली व तडजोड अंती १००० हजार रुपये लाचेची रक्कम ठरली.

ही रक्कम मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली.

सदर तकारीवरून नाशिक येथील पथकाने सापळापूर्व पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान लहु सपकाळे यांनी १५०० रूपये व यादव यांनी तीन फाईलची १५०० रूपये लाचेची मागणी केली व तडजोडअंती १००० रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांचेविरुध्द शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे आज रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

bribe case
Crime News : चारचाकी वाहन चोरणारी टोळी अटकेत; दोन पिक-अप, एक दुचाकी जप्त

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा वारंगे वालावलकर, अपर पोलीस अधिक्षक नारायण न्याहळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोनि साधना भोये बेलगावकर करीत आहेत.

सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक मीरा आदमाने तसेच पथकातील पोलिस कर्मचारी एकनाथ बाविस्कर,चंद्रशेखर मोरे, प्रविण महाजन,नितीन कराड, संतोष गांगुर्डे,परशुराम जाधव आदींनी ही कारवाई यशस्वी केली.

दरम्यान गाय गोठा फाईलीसह मनरेगाच्या विविध फायलींच्या विविध चर्चा अनेक दिवसापासून येथे सुरू होत्या.त्या चर्चात तथ्य असल्याचे आजच्या कारवाईतून पुढे आले आहे.फाईल प्रकरणात खोलवर जाऊन तपास करण्याच्या अपेक्षाही व्यक्त होत आहे.

bribe case
Dhule Crime News : एमआयडीसीत सोयाबीन चोरी; 6 जणांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com