सोशल मिडीयातून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर होणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin patil

सोशल मिडीयातून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर होणार कारवाई

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरातील धार्मिक सलोखा वाखाणण्याजोगा आहे. आगामी रमजान ईद (Ramzan eid) व अक्षयतृतीया (Akshay Tritiya) हे सण शांततेत व उत्साहात साजरे करा, असे आवाहन करतानाच सोशल मिडीयातून (Social Media) सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील (District Superintendent of Police Sachin Patil) यांनी शनिवारी (ता. ३०) दिला.

हेही वाचा: नाशिक : वावी येथे चोरट्यांचा धुडगूस

श्री. पाटील यांनी शनिवारी शहरास भेट देऊन रमजान ईदनिमित्त पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यांना मार्गदर्शनपर विविध सूचना दिल्या. पोलिस प्रशासन सज्ज असून, सोशल मिडीयावर सायबर सेलसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे विशेष लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक सोशल मिडीयाचे प्रतिनिधी, युट्युब चॅनलधारक यांच्याशीही त्यांनी चर्चा करुन बातम्या व अन्य मजकुरासंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. या वेळी अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक लता दोंदे, प्रदीपकुमार जाधव आदींसह विविध पोलिस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: Summer Update : मालेगाव तापले; उष्माघाताने अनोळखी वृध्दाचा मृत्यू

Web Title: Action Will Taken Against Those Who Create Social Rift Through Social Media Sachin Patil Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top