NMC Tax Discount Scheme : महापालिकेच्या तिजोरीत 8 दिवसात 3 कोटीची भर! सवलत योजनेचा दुसरा टप्पा | Addition of 3 crores in 8 days to municipal corporation Second phase of NMC Tax Discount Scheme nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC News

NMC Tax Discount Scheme : महापालिकेच्या तिजोरीत 8 दिवसात 3 कोटीची भर! सवलत योजनेचा दुसरा टप्पा

NMC Tax Discount Scheme : उत्पन्नात वाढ करण्यासाठी महापालिकेने अमलात आणलेल्या सवलत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे मे महिन्याच्या आठ दिवसात तीन कोटी तीस हजार रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

सात हजार ६०२ करदात्यांनी सवलतीचा लाभ घेतला. एप्रिल महिन्यात एक लाख २७ हजार ९९१ करदात्यांनी ५१ कोटी ८० लाखांची आगाऊ घरपट्टी भरली आहे. (Addition of 3 crores in 8 days to municipal corporation Second phase of NMC Tax Discount Scheme nashik news)

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसाठी महापालिकेला स्वउत्पन्नात वीस ते पंचवीस टक्के वाढ करणे बंधनकारक आहे. त्यामुळे घरपट्टीची शंभर टक्क्यांपेक्षा अधिक वसुली करण्यासाठी सवलत योजना लागू करण्यात आली आहे.

या योजनेत एप्रिल महिन्यात संपूर्ण घरपट्टी एकरक्कमी अदा केल्यास आठ टक्के, मे महिन्यात सहा, तर जून महिन्यात तीन टक्के सवलत योजना आहे. १ ते ३० एप्रिलदरम्यान १ लाख २७ हजार ९९१ करदात्यांनी ५१ कोटी ८० लाखांची आगाऊ घरपट्टी भरली आहे.

यामध्ये मागील वर्षाच्या तीन कोटी थकबाकीचाही समावेश आहे. एकूण पंचवीस टक्के वसुली झाली असून, एक महिन्यातील विक्रमी घरपट्टीची वसुली मानली जात आहे. मागील वर्षी घरपट्टीतून १८८ कोटी रुपये महसुल जमा झाला होता.

या वर्षी तेवढेच उद्दिष्ट देण्यात आले. आगाऊ घरपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांना दोन कोटी ७४ लाख ६६ हजार रुपये सूट मिळाली आहे. सौरऊर्जा प्रकल्प, सोलर वॉटर हिटर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पाच टक्के सवलत देण्यात आली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दरम्यान, मे महिन्यात सहा टक्के सवलतीचा लाभ सात हजार ६०२ करदात्यांनी घेतला.

करदाते व विभागनिहाय घरपट्टी वसुली (रुपयात)

विभाग करदाते वसुली

सातपूर ७६५ ३१ लाख २२ हजार
पश्चिम ७३६ ४२ लाख १९ हजार
पूर्व १३७८ ४९ लाख २६ हजार
पंचवटी १४८२ ६१ लाख ५४ हजार
सिडको २०३५ ७० लाख सहा हजार
नाशिकरोड १२०६ ४६ लाख पाच हजार
----------------------------------------------------------------------
एकूण ७६०२ तीन कोटी ३३ लाख