NMC News : विभागीय आयुक्त गमेंकडे महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Radhakrishna Game

NMC News : विभागीय आयुक्त गमेंकडे महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार

नाशिक : महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार कौटुंबिक कारणास्तव ६ ते १७ मार्च दरम्यान रजेवर जात असल्याने आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार विभागीय आयुक्त राधाकृष्णन यांच्याकडे देण्यात आला आहे. (Additional charge of municipal corporation to Divisional Commissioner Game NMC News)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

६ ते १७ मार्च या दरम्यान आयुक्त पुलकुंडवार हे कौटुंबिक कारणासाठी रजेवर जाणार असल्याने त्यांनी राज्य शासनाकडे रजेसाठी अर्ज सादर केला होता. नगर विकास विभागाचे अपर सचिव आरती देसाई यांनी त्यांच्या रजेचा अर्ज मंजूर करताना त्यांच्या रजा कालावधीतील अतिरिक्त कार्यभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविला आहे.

गमे यांनी यापूर्वी महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. महापालिकेचा अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार घेण्यासाठी जिल्ह्यातील अनेक जण इच्छुक होते.

टॅग्स :NashiknmcNMC commissioner