आडगाव शिवार बनलाय मृत्युचा सापळा; 3 महिन्यात आठ अपघाती मृत्यू

road accident
road accidentesakal

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू हा आडगाव शिवारातील महत्वाचा विषय बनला आहे. आडगावला शेरे पंजाब धाब्यासमोर तीन महिन्यात आठ अपघाती मृत्यू झाले आहेत. एकाच भागात वारंवार होणाऱ्या मृत्युमुळे हा परिसर मृत्यूचा सापळा बनला आहे. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगेवगेळ्या अपघातात (Accident) अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवकांचे मृत्यू झाले. दोन्ही घटनातील वाहन चालक अपघातानंतर पळून गेले.

road accident
Aurangabad Accident News | वैजापूर-गंगापूर रस्त्यावर भीषण अपघात; ३ मजूर ठार

नाशिक औरंगाबाद मार्गावर वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी असलेल्या युवकाचा मृत्यू झाला. महेश निंबारा (वय २३, नारवड, झिमनपाडा, जि. वलसाड गुजरात) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. मृत महेश हा युवक काही दिवसांपासून माडसांगवी शिवारात टोल नाक्याजवळ रोहन पेखळे यांच्या मळ्यात राहायचा. रात्री नऊला रस्त्याने भरधाव चाललेल्या वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यात त्याचे निधन झाले. दुसरा अपघात मुंबई आग्रा महामार्गावर शेरे पंजाब हॉटेल परिसरात घडला. अज्ञात वाहनाच्या धडकेत एका युवकाचा यात मृत्यू झाला. गुरुवारी (ता.३१) रात्री सव्वा अकराच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी वेगवेगळ्या तक्रारीवरुन आडगाव (Adgaon) पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

road accident
Missile Accident: बदल्यासाठी पाकिस्तान तयार होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com