मातृछाया हरपलेल्या आदित्यला मिळाले शैक्षणिक पालकत्व

Nashik
Nashikesakal

कोकणगाव (जि. नाशिक) : परिस्थितीअभावी शैक्षणिक गरजा पूर्ण न झाल्याने अनेक हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण होत नाही. मात्र शिक्षण घेण्याची जिद्द कायम असेल तर या विद्यार्थ्यांना दिशा ही मिळतेच. असाच या गावातील मातृछाया हरपलेला व भंगार जमा करणारा गरिब विद्यार्थी आदित्य यादव या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्व पृथ्वीबाबा शिरसाठ यांनी स्विकारले आहे.

आदित्य वर्गात प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी

आदित्य हा मूळचा उत्तर प्रदेशचा. तीन वर्षापूर्वी आदित्यचे मातृछत्र हरपले व मग वडिलांनी महाराष्ट्र गाठले. भंगार गोळा करुन कसाबसा त्यांचा उदरनिर्वाह होऊ लागला. जिल्हा परिषद शाळा आरगडेवस्ती येथे आदित्यला शाळेत टाकले. आदित्य महाराष्ट्र व मराठी भाषेशी अतिशय समरस होऊन वर्गात प्रथम क्रमांक मिळवू लागला. पण वडिल भंगार गोळा करुन त्याची शैक्षणिक भुक भागवू शकत नाही हे ओळखून तेथील शिक्षक पृथ्वीबाबा शिरसाठ यांनी शैक्षणिक दत्तक घेण्याचा संकल्प केला. शिवसृष्टी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंती पर्वणीवर रक्तदान, अवयवदान संकल्प, अनाथालयास मदत, आत्महत्याग्रस्तांना मदत असे सामाजिक काम होत असते. यावेळी आदित्यचे वडिल विश्वनाथ यादव यांना अधिकृत शैक्षणिक दत्तक पालकत्व बाबतचे पत्र देण्यात आले. या प्रसंगी शिवाजी बोराडे, दत्तात्रेय मोरे, उपशिक्षिका सुनिता दुकळे व विद्यार्थी उपस्थित होते.

Nashik
आरटीई प्रक्रिया अद्यापही काही जिल्हयात ‘लॉक’

''अत्यंत हुशार असलेल्या पण मातृछाया हरपलेल्या आदित्यचे शैक्षणिक पालकत्व घेतल्याने यापुढील शिक्षणास त्याला फार मोठी मदत होईल.'' - सुनिता दुकळे, उपशिक्षिका जि. प. शाळा आरगडेवस्ती

''छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांवर समर्पीत होत पृथ्वीबाबा शिरसाठ हे नेहमी छोटे मोठे उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जपत असतात.'' - केशव तुंगार गटशिक्षणाधिकारी पं.स. निफाड

Nashik
स्पायडर मॅनचा अभिनेता टॉम वेटरच्या नोकरीसाठी गेला, मॅनेजरनं चक्क...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com