आरटीईअंतर्गत उद्यापासून प्रवेशप्रक्रिया सुरू

RTE
RTEgoogle
Summary

शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार पंचवीस टक्के अंतर्गत राखीव जागांसाठी एप्रिल २०२१ रोजी निवड यादी जाहीर करण्यात आली होती. यात निवड यादीत नाव असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया शुक्रवार (ता.११) पासून सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक : बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार (RTE) अन्वये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी एप्रिलमध्ये निवड यादी जाहीर करण्यात आली होती, परंतु लॉकडाउनमुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित झाली. आता शुक्रवारी (ता. ११) निवड यादीतील विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी दिली. (Admission process under RTE starts from 11 june)


शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार पंचवीस टक्के अंतर्गत राखीव जागांसाठी एप्रिल २०२१ रोजी निवड यादी जाहीर करण्यात आली होती. यात निवड यादीत नाव असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया शुक्रवार (ता.११) पासून सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठीची तारीख आरटीई पोर्टलवर दिली जाणार आहे. तारीख मिळाल्यानंतर पालकांनी मूळ कागदपत्र आणि छायांकित प्रती घेऊन दिलेल्या तारखेस संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनामुळे प्रत्यक्षरीत्या शाळेत प्रवेशासाठी येऊ न शकणाऱ्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनी, व्हॉटस ॲपद्वारे शाळेशी संपर्क साधून प्रवेशाची कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आल्या आहेत.
(Admission process under RTE starts from 11 june)

RTE
आश्चर्यच! कोरोनाची लस घेतली अन् शरीराला आले चुंबकत्व?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com