
Adv Nitin Thakare : मविप्रच्या शाखेला देणार कर्मयोगी जाधव यांचे नाव | ॲड. नितीन ठाकरे
जानोरी/मोहाडी : कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव यांनी मराठा विद्या प्रसारक संस्थेत सर्वाधिक कालावधीसाठी संचालक म्हणून काम केले आहे.
त्यांच्या या योगदानाबद्दल संस्थेतील त्यांच्या कार्याला शोभेल अशा पद्धतीने एका शाखेला त्यांचे नाव देण्यात येईल. असे प्रतिपादन संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. (Adv Nitin Thakare statement about naming mvp by Karmayogi Eknath Bhau Jadhav nashik news)
मोहाडी (ता. दिंडोरी) येथे कर्मयोगी जाधव यांच्या स्मृतीदिनानिमित्त मोहाडी महोत्सव, मविप्र सभासदांचा कृतज्ञता मेळावा व कार्यकारणीच्या सत्कार सोहळ्यात श्री. ठाकरे बोलत होते. एकनाथभाऊंच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांचा वारसा खंबीरपणे पुढे चालवत असलेले संचालक प्रवीण जाधव यांचे संघटन कौशल्य आणि कार्य कुशलतेची त्यांनी प्रशंसा केली.
तसेच, नवनिर्वाचित कार्यकारणीसोबतच विजयामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा सर्व समाज धुरिणांचा यथोचित सन्मान झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नवनिर्वाचित कार्यकारणी निश्चितच सभासदांच्या सर्व अपेक्षा येत्या काळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. ज्येष्ठ सभासद ॲड. संतोष गटकळ अध्यक्षस्थानी होते.
मशाल नृत्याच्या माध्यमातून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. के. आर. टी. हायस्कूल गीत मंचने गणेश वंदना सादर केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, सरचिटणीस ॲड. ठाकरे, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, कार्यकारी संचालक ॲड. संदिप गुळवे, डॉ. सयाजीराव गायकवाड, ॲड. लक्ष्मण लांडगे,
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
शिवाजी गडाख, अमित बोरस्ते, डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. रमेशचंद्र बच्छाव, विजय पगार, रमेश पिंगळे, संचालिका शोभाताई बोरस्ते, शालनताई सोनवणे, सेवक संचालक संजय शिंदे, चंद्रजित शिंदे, जगन्नाथ निंबाळकर, विशेष सत्कारार्थी नानासाहेब बोरस्ते, डॉ. ए. के. पवार, संपतराव घडवजे, डॉ. भास्करराव पवार, दत्तात्रय पाटील, डॉ. भाऊसाहेब मोरे, ॲड. मनिष बस्ते, गणपतराव पाटील, प्रकाश वडजे, नरेंद्र जाधव, संपतराव गावले, बाळासाहेब मुरकुटे,
भास्करराव गटकळ, विजय गडाख, नानासाहेब दाते, पी. बी. गायधनी, साहेबराव पाटील, राजाराम बस्ते, बाळासाहेब कोल्हे, निर्मलाताई खर्डे, मविप्र शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. रमेश दरेकर, डॉ. डी. डी. जाधव, डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. नितीन जाधव, डॉ. अजित मोरे आदींचा तालुक्यातील संस्थेच्या शाखेतील प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आयोजक संचालक प्रवीण जाधव यांनी स्वागत केले. कार्यकारिणीने दिंडोरी येथे नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल तालुक्याच्या वतीने कार्यकारिणीला धन्यवाद देण्यात आले. संपतराव घडवजे, सुरेश सोमवंशी, चंद्रकांत काळोगे, वसंतराव कावळे, रवींद्र मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा. विलास देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रा. धनंजय देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कैलास कळमकर यांनी आभार मानले.