
नाशिक : 2 वर्षांनंतर वर्षश्राद्धनिमित्त कीर्तन, प्रवचनांची रेलचेल
अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने जगभरात हाहाकार माजवला होता. देशभरात लॉकडाउन लागले होते. अनेकांचे घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाले. त्यांचे साधे अंतिम दर्शनही होऊ शकले नाही. वर्षभरानंतर निर्बंध शिथिल झाले आहेत आणि कोरोनात मृत्यू झालेल्यांचे वर्षेश्राद्ध नातलग आप्तेष्टांच्या भरगच्च उपस्थितीत कीर्तन, प्रवचनादी धार्मिक विधी मोठ्या थाटात केले जात आहेत.
कोरोनाने माणसे गमावलेली कुटुंबे आजही त्या सावटाखाली
फेब्रुवारी-मार्च महिन्यात विवाह सोहळ्यांची धूम असते. यंदा मात्र लग्नांपेक्षा वर्षेश्राद्ध खूपच अधिक प्रमाणात आहे. मागील वर्षी फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान कोरोनाबाधित रुग्णसंख्येचे प्रमाण लक्षणीय होते. चालता-बोलता माणसे सोडून जात होती. पॉझिटिव्ह आल्यास रुग्णालयात लाखोंचा खर्च करूनही माणूस पुन्हा घरी येईल की नाही, याची शास्वती नव्हती. ऑक्सीजनची कमतरता, अशा एकापाठोपाठ एक हृदय हेलविणाऱ्या घडलेल्या घटनाक्रमांमुळे संपूर्ण वातावरण अत्यंत भयावह झाले होते. कोरोनाने आतापर्यंत इगतपुरीत १८७ जणांचा मृत्यू झाला, तर फेब्रुवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान १४३ रुग्ण दगावली आहेत. या सर्व परिस्थितीला आता वर्ष पूर्ण होत आहे. कोरोनाने माणसे गमावलेली कुटुंबे आजही त्या सावटाखाली जीवन जगत आहेत. कोरोना लाटेत मृत्यू झालेल्यांना आता वर्ष पूर्ण होत आहे. दशक्रिया विधी करू न शकलेल्यांनी आता वर्षेश्राद्ध मोठ्या स्वरूपात करण्याचा चंग बांधला आहे. कीर्तनकारांची कीर्तन, प्रवचन, संगीत भजन आदी भरगच्च कार्यक्रम आप्तेष्ट, सगेसोयरे, भाऊबंदच्या उपस्थितीत विशेष पक्वांनांच्या शाही मेजवानीत वर्षेश्राद्ध सोहळे होत आहेत.
हेही वाचा: सर्पदंश झालेल्या महिलेचा अंधश्रद्धेने घेतला बळी; उपचाराअभावी मृत्यू
''मागील दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा प्रकोप तुलनेने ग्रामीण भागात जास्त होता. चालता-बोलता माणसे सोडून जात होती. हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नव्हते. ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागला होता. अत्यंत भयावह परिस्थिती अनुभवली होती. आजही रुग्णवाहिकेचा नुसता आवाज ऐकू आला तरी हृदयात धडकी भरल्यासारखे होते.'' - उत्तम गुळवे
हेही वाचा: गांधील माशी चावल्याने पोलिसाचा मृत्यू; दिंडोरी पोलिस ठाण्यातील घटना
Web Title: After 2 Year Kirtans For Death Anniversary Who Die Due To Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..