
Nashik News : खरेंच्या अटकेनंतर जिल्हा उपनिबंधकपदाचा पदभार एस. वाय. पुरी यांच्याकडे
Nashik News : तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केल्यानंतर विभागीय सहनिंबधक कार्यालयाने तत्काळ खरे यांचा जिल्हा उपनिबंधकपदाचा पदभार सहनिबंधक सहकारी संस्था (आदिवासी विकास) चे एस. वाय. पुरी यांच्याकडे सोपविला आहे. (After Khare arrest bribe case took over post of District Deputy Registrar to SY Puri Nashik News)
पुरी यांनी मंगळवारी (ता.१६) या पदाचा पदभार स्वीकारत कामकाजास सुरवात केली. नाशिक रोड व्यापारी सहकारी बॅंक निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी पदाचा देखील पदभार पुरी यांच्याकडे आला आहे.
दरम्यान, खरे यांनी सोमवारी घेतलेल्या सुनावणी वादात सापडल्या आहेत. त्यामुळे एस. वाय. पुरी यांच्याकडून या प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी प्रक्रीया घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे नेमका काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
लाचलूचपतच्या अहवालानंतर निलंबनाचा प्रस्ताव
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खरे यांच्यावरील कारवाईचा अहवाल विभागीय सहनिंबधक कार्यालयास अद्याप प्राप्त झालेला नाही. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागाकडून राज्य शासनाकडे सादर होईल.
तत्पूर्वी विभागीय सहनिंबधक विभागाने खरे यांच्याबाबतचा तोंडी अहवाल सहकार विभागास कळविला आहे.