कडकडीत बंदनंतर कापड व्यवसायिकांना उभारीची अपेक्षा

Nashik Market
Nashik MarketGoogle

नाशिक : दोन-अडीच महिन्यांच्या कडकडीत लॉकडाउननंतर (Lockdown) हळूहळू स्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र, ग्राहकांच्या क्रयशक्तीत घट झाल्याने मेनरोडवरील मुख्य व्यवसाय असलेला कापड व्यवसाय निम्म्यावर आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. मात्र, हळूहळू स्थिती पूर्वपदावर येऊ लागल्याने नव्याने उभारी घेण्याची जिद्द व्यावसायिकांनी व्यक्त केली. (After lockdown the situation in Nashik market is slowly returning to normal)

कोरोनामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने कडकडीत बंद पुकारल्याने कष्टकरी, कामगार आदींबरोबरच व्यावसायिकांनाही मोठ्या आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले. आता नाशिकचा समावेश तिसऱ्या टप्प्यांत झाल्याने प्रशासनाने व्यावसायिकांना सकाळी सात ते दुपारी चार या काळात व्यवसाय करण्याची मुभा दिली. मात्र, ग्राहकांचा कल केवळ जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीकडे असल्यामुळे कपड्याची मोठी बाजारपेठ असलेल्या मेनरोडवरील सर्वच व्यवसाय निम्म्यावर आल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली. मेनरोड म्हटले रेडिमेड कपड्यांसह इतर कपडे मिळण्याचे मध्यवर्ती ठिकाण. येथे खरेदीसाठी बारमाही गर्दी असते. परंतु, काही दिवसांपासून व्यवसायावर निर्बंध आल्याने सर्वच ठप्प होते. आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

Nashik Market
नाशिक-पुणे रेल्वे : बाधित शेतकऱ्यांना मिळणार ५ पट मोबदला?

पुढील महिन्यापर्यंत काही विवाह तिथी आहेत. त्यामुळे हळूहळू स्थिती पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने वेळ वाढवून दिल्यास होणाऱ्या गर्दीवर काही प्रमाणात अंकुश येईल, कारण पुण्यासह अन्य ठिकाणी सायंकाळी सातपर्यंत व्यवसायांना परवानगी दिली आहे.

- नरेश पारख, अध्यक्ष, नाशिक क्लॉथ मर्चंट असोसिएशन

सततच्या बंदमुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच नोकर, वीजबिल, विविध प्रकारचे कर यामुळे त्रस्त आहोत. सद्या व्यावसायिकांना देणी मोठी व उत्पन्न निम्म्यावर अशी परिस्थिती आहे.

- राजेंद्र बागूल, माजी नगरसेवक, व्यावसायिक

Nashik Market
बागलाणच्या मातीत काश्मीरची सफरचंद; शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

उत्पन्न घटल्याने ग्राहकांचा कल फक्त जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीकडे आहे. त्यामुळे इतर वस्तूंना फारशी मागणी नाही, मात्र हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

- धीरज मनवानी, संचालक, जयहिंद क्लॉथ स्टोअर्स, मेनरोड

ग्राहकांचा कल साबण, गरजेच्या वस्तू अशा वस्तूंच्या खरेदीकडेच आहे. त्यामुळे व्यवसाय निम्म्यावर आले आहे. वेळेचे बंधन असल्याने ग्राहक गर्दी होतेय. त्यामुळे प्रशासनाने वेळ वाढवून देणे गरजेचे आहे.

- दिलीप कासलीवाल, संचालक, प्रकाश सुपारी

खरेदीसाठी परिस्थिती नाही, मात्र तरीही अनेक कारणांमुळे कपडे घ्यावेच लागतात. त्याला पर्याय नसल्याने उधार- उसनवार करून कपडे घ्यावेच लागतात.

- राजकुमार अंबुरे, ग्राहक

(After lockdown the situation in Nashik market is slowly returning to normal)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com