
Nashik News : माहिमनंतर आनंदवली दर्गा चर्चेत! दर्ग्याला NMCची नोटीस
नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई महापालिकेने माहीम दर्ग्यावर २४ तासात कारवाई केल्याचे प्रकरण ताजे असताना शुक्रवारी (ता. २४) नाशिक महापालिका नगररचना विभागाने आनंदवल्ली येथील दर्ग्याला नोटीस पाठवली असून सात दिवसात खुलासा मागविला. (After Mahim Anandavali Dargah in discussion NMC notice to Darga Nashik News)
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
दर्गा ट्रस्टने यावर खुलासा न केल्यास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवणार असल्याचा इशारा नोटिसीद्वारे संबंधित दर्गा प्रशासनास देण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाकडून संबंधित ट्रस्टला नोटीस बजावली. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेच्या नगररचना विभागाने नोटीस काढली आहे.
दर्गाच्या बाजूला असलेले पत्र्याचे शेड, पक्के बांधकाम बेकायदेशीर असल्याचा प्रशासनाचा नोटिशीमध्ये उल्लेख केला असून सात दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे. सात दिवसात खुलासा न केल्यास पालिका बुलडोझर चालवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.