Nashik News : आदिवासी विकास अधिकाऱ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू

meeting
meetingesakal

Nashik News : इतर विभागातून प्रतिनियुक्ती आलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आदिवासी विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३) अधिकाऱ्यांचे सामुहिक रजा आंदोलन सुरू राहिल्याने दैनंदिन कामकाज ठप्प झाले होते.

अमरावतीचे अपर आयुक्त वानखेडे यांची कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच बदली करून, त्यांच्या रिक्त जागी ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली. (agitation of tribal development officers continues for second day Nashik News)

या नियुक्तीला विभागातील अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवीत अधिकाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विभागातील अधिकाऱ्यांना अनेक वर्षे विभागातील वेगवेगळ्या पदावर काम करण्याचा अनुभव आहे.

विभागातील पात्र अधिकाऱ्यांना डावलले जात असल्याकडे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे लक्ष वेधण्यात आले. दरम्यान, संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना ना. डॉ. गावित यांनी महिनाभरात अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

तर १५ जूनपर्यंत मान्य न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पोळ यांनी दिला. यावेळी संदीप गोलाईत, सुरेश रामटेके, अविनाश चव्हाण, किरण माळी, सुदर्शन नगरे, शशिकला अहिरराव, हेमलता गव्हाणे, स्नेहल गोवेकर, अनिता दाभाडे, रोहिणी कर्पे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

meeting
NEET Exam : ‘नीट’ परीक्षेला 12 हजार विद्यार्थी जाणार सामोरे; 20 केंद्रांवर ऑफलाइन परीक्षा

अन्यथा काम बंद आंदोलन

आदिवासी विकास विभागातील वर्ग एक व वर्ग दोन दर्जाचे अधिकारी एकवटले असून आदिवासी विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. ३) मुंबईत आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची भेट घेऊन प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली.

डॉ. गावित यांनी महिनाभरात अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. तर १५ जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पोळ यांनी दिला.

meeting
NMC News: महापालिकेकडून शालिमार भागात अतिक्रमण मोहीम; गळ्यांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com