ग्रामपंचायत ते महापालिका भगवा फडकणारच; कृषिमंत्र्यांचा दावा 

dada bhuse 1234.jpg
dada bhuse 1234.jpg

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू झाला असून, सर्वसामान्य नागरिक त्यांच्या कामावर खूश आहे. त्यामुळेच आगामी ग्रामपंचायत ते महापालिकांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकणारच, असा दावा कृषिमंत्री दादा भुसे यांनी केला. 

ग्रामपंचायत ते महापालिका भगवा फडकणारच 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आवाहन करताना संघटना पातळीवर नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या. निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून गाव, तालुका व शहर या तीन स्तरांवर शिवसेनेचे मंत्री बैठक घेतील. गेल्या वर्षभरात संपूर्ण जगाला कोरोनाने ग्रासलेले असताना महाराष्ट्र सरकारने केलेल्या अनेक महत्त्वाच्या उपाययोजना तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्यासाठी सोशल मीडियाची स्वतंत्र टीम तयार करण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या. नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जाणार आहे. बैठकीचे सूत्रसंचालन विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केले. 

करंजकर, बडगुजर यांचा सत्कार 
नाशिक जिल्हा संपर्कमंत्री म्हणून कृषिमंत्री दादा भुसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा समावेश करण्यात आल्याने, तसेच महानगरप्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

शिवसेनेच्या बैठकीत कृषिमंत्री भुसे यांचा दावा 

शिवसेना भवनमध्ये आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीनिमित्त रणनीती ठरविण्यासाठी पदाधिकऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार सुहास कांदे, नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार अनिल कदम, योगेश घोलप, काशीनाथ मेंगाळ, निर्मला गावित, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महापालिका गटनेते विलास शिंदे, उदय सांगळे, मोहन गांगुर्डे, भास्कर गावित आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com