Nashik Bribe Crime : 2 हजाराची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe crime

Nashik Bribe Crime : 2 हजाराची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकास अटक

मालेगाव (जि. नाशिक) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ठिबक सिंचनासाठी लाभार्थी म्हणून निवड झालेली असताना, तक्रारदार व त्यांचा भाऊ यांनी त्यांचे शेतजमिनीवर फळबाग लागवड करून ठिबक सिंचनचे काम केले.

सदर ठिबक सिंचनाच्या कामाच्या फाइलची तपासणी करून बिले ऑनलाइन अपलोड करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक सुधाकर विश्वनाथ सोनवणे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. (Agriculture supervisor arrested for taking bribe of 2 thousand Nashik Bribe Crime news)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

कृषी पर्यवेक्षक श्री. सोनवणे यांच्याबद्दल ठिबक लाभार्थी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा घारगे - वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधिक्षक नारायण न्याहळदे, पोलिस निरीक्षक साधना भोये- बेलगांवकर व सहकाऱ्यांनी सापळा रचून कौळाणे (निं) (ता. मालेगाव) येथील बस थांब्याजवळ बंद टपरीसमोर लाच स्वीकारताना सुधाकर सोनवणे रंगेहाथ अटक केली. २१ मार्चला ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.