Nashik Crime: खासगी व्यापाऱ्याकडे एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा शिधा; 83 हजाराचा ऐवज जप्त

crime
crimeesakal

Nashik Crime : राज्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून अंगणवाडीतील चिमुकले, स्तनदा, गर्भवती माता यांना शिधा वाटप करण्यात येतो. राज्य शासन यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते.

आता या शिधा वाटपातही गैरव्यवहार आढळून आला आहे. चिमुकले व स्तनदा मातांसाठीचा असलेला हा घास काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सहाय्यक अधीक्षकांचे पथक व छावणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने सटाणा रोडवरील एका गोदामात खासगी व्यापाऱ्याकडे छापा टाकून सुमारे ८३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. (Allotment of Integrated Child Development Project to private trader 83 thousand instead of seized Nashik Crime)

एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा शिधा गायब करणारी मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय यामुळे निर्माण झाला आहे. सहाय्यक अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक क्षिरसागर, पोलिस निरीक्षक ढोकणे, सहाय्यक निरीक्षक पाटील,

उपनिरीक्षक सुनील आहिरे, पोलिस नाईक मोरे, श्री. बागूल, दिनेश शेरावते, बेदाडे आदींनी सटाणा रस्त्यावरील मधुबन हॉटेल जवळील मंगलमूर्ती पॅकेजिंग शेजारी असलेल्या ललित पहाडे यांच्या मालकीच्या गोदामात छापा टाकला असता तेथे पवन सुरेश अग्रवाल (वय ३८, रा. मारवाडी गल्ली कॅम्प) हा उपस्थित होता.

पवनने गोदाम उघडले असता पांढरे रंगाच्या गोण्यांमध्ये पाकिटे आढळून आली. कारवाई करताना पुरवठा अधिकारी प्रशांत काथेपुरी, नायब तहसीलदार शरद निकम, केंद्रप्रमुख सुनंदा पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime
Ahmednagar Crime : भर लग्नात पोलीस आले अन् लग्न लागण्याआधी नवरदेव पोहचला ठाण्यात; काय आहे प्रकरण?

पोलिस पथकाला छाप्यात दाळ पाकिट, मिरची पावडर, मसाला, हळद पावडरचे पाकीट, चना व गहू असा सुमारे ८२ हजार ८९० रुपयांचा ऐवज मिळून आला. गोदामात अनेक रिकाम्या गोण्या होत्या. या सर्व पाकिटांवर महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (नॉट फॉर सेल) असा मजकूर होता.

येथील बालविकास प्रकल्प अधिकारी नरेश अहिरराव (वय ५२, रा. कर्मवीरनगर, साक्री) यांच्या तक्रारीवरून ललित पहाडे यांच्या विरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
Crime News: 'सुट्टीसाठी गावावरून आणलं अन्...' वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्याला अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com