esakal | ‘ॲकोनकागुवा’ मोहिमेसाठी अनिल वसावे सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

anil wasave

‘ॲकोनकागुवा’ मोहिमेसाठी अनिल वसावे सज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रशियातील ‘एल्ब्रस’ आणि दक्षिण आफ्रिकेतील ‘किलीमांजारोवर’ ही सर्वोच्च शिखरे यशस्वीरित्या सर केल्यानंतर आता अक्कलकुवा (जि. नंदुरबार) येथील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे हा दक्षिण अमेरिकामधील सर्वात उंचीचे ‘ॲकोनकागुवा’ हे शिखर सर करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या २० डिसेंबरपासून तो या माहिमेस सुरवात करणार आहे. या मोहिमेसाठी अनिलला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी त्याने आदिवासी विकास विभागाला साकडे घातले असून, आता त्याला निधीची प्रतिक्षा आहे.

बालाघाट (जि. नंदुरबार) या अतिदुर्गम भागातून व अतिशय गरीब कुटुंबातील अदिवासी समाजाच्या अनिलने आपली मेहनत व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रशियामधील एल्ब्रस आणि दक्षिण आफ्रिकेतील

किलीमांजारोवर ही सर्वोच्च शिखरे सर करून, या ठिकाणी तिरंगा फडकावित नंदुरबारसह राज्याचे नाव जगाच्या नकाशावर झळकवले आहे. या दोन मोहिमा सर केल्यानंतर आता अनिल डिसेंबर २०२१ मध्ये दक्षिण अमेरिकामधील ॲकोनकागुवा हे ६ हजार ९८० मीटर उंचीचे शिखर सर करण्यासाठी पुन्हा सज्जझाला आहे.

हेही वाचा: शिक्षण उपसंचालकांचा खुलासा; पाहा व्हिडिओ

मोहिमेला अडसर निधीचा

डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत अनिल चढाईस सुरवात करणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अनिलसमोर निधीचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. अनिलला प्रशिक्षक, येण्या-जाण्याच्या खर्चासह, स्पर्धा प्रशिक्षण यासाठी जवळपास १९ लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र, अतिशय गरीब कुटुंबातील असल्याने अनिल हा खर्च पेलवू शकणार नाही. त्यामुळे त्याने आदिवासी विकास विभागाकडे न्यूक्लीअर बजेट अंतर्गत सदरचा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रस्ताव दिला आहे. निधीसाठी अनिलने आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी, आदिवासी आयुक्त यांना देखील निवेदन दिले असून, निधीसाठी प्रस्ताव देखील सादर केला आहे. अनिलचा निधीसाठी पाठपुरावा सुरु असून, त्याला विभागाकडून निधीची प्रतिक्षा आहे.

loading image
go to top