Nashik News : वक्फ संस्थाविश्वस्तांना द्यावा लागणार वार्षिक अर्थसंकल्प; 30 दिवसांची मुदत | Annual budget to be given to Waqf trustees 30 days term Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

budget

Nashik News : वक्फ संस्थाविश्वस्तांना द्यावा लागणार वार्षिक अर्थसंकल्प; 30 दिवसांची मुदत

Nashik News : वक्फ धार्मिक स्थळे आणि संस्थां विश्वस्तांना आता वक्फ मंडळास अर्थसंकल्प द्यावा लागणार आहे. या शिवाय वक्फ मिळकती भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भातील नियमावलीही वक्फ मंडळाकडून तयार करण्यात आली आहे.

याबाबतचे पत्र आणि नोटीस वक्फ धार्मिक स्थळे आणि संस्था विश्वस्तांना पाठविण्यात आल्या आहेत. तीस दिवसात अर्थसंकल्प सादर करण्याच्या सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत. (Annual budget to be given to Waqf trustees 30 days term Nashik News)

शहरासह राज्यभरात विविध धार्मिक स्थळे आणि संस्था वक्फ करण्यात आल्या आहे. याचे सर्व अधिकार विश्वस्त तसेच वक्त मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या विश्वस्त समिती आणि वक्फ मंडळास देण्यात आले.

त्यानुसार वक्फ नोंदणी असलेल्या दर्गा मशीद यांची देखभाल दुरुस्ती तसेच विविध कामे विश्वस्तांकडून केली जातात. कामे करण्यापूर्वी मंडळाची अधिकृत परवानगी घेतली जाते. कामाचा जमा खर्च सादर केला जातो.

यंदापासून त्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहे. धार्मिक स्थळांसह अन्य वक्फ संस्थांना वर्षभरात करण्यात येणारे विविध कामे देखभाल दुरुस्ती धार्मिक कार्यक्रमांना येणारा खर्च या सर्व प्रकारच्या खर्चासंदर्भात वार्षिक नियोजन करावे लागणार आहे.

नियोजनासाठी येणारा खर्च लक्षात घेता नवीन वर्षापूर्वी त्याचा अर्थसंकल्प तयार करून मंडळास सादर करावा लागणार आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ३० दिवसात सादर करण्याचेही सांगण्यात आले आहे.

शहरातीलही वक्फ धार्मिक स्थळ आणि संस्था विश्वस्तांकडून अर्थसंकल्प तयार करण्याच्या कामास सुरवात केली आहे. त्याचप्रमाणे वक्फ मिळकती भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भातही काही नियमावली तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वक्फ मिळकती भाडेतत्त्वावर देताना भाडेकरूंशी करार तयार करण्यात येणार आहे. ११ महिन्याच्या करारावर मिळकत भाडेतत्त्वावर देण्याचे अधिकार मंडळातर्फे विश्वस्तांना देण्यात आले आहे.

११ महिन्यांपासून पुढे ३ वर्षाचा कराराचे अधिकार राज्य वक्फ मंडळाकडे असून त्यांच्या परवानगीनेच करण्यात आलेला करार वैध असणार आहे. ३ वर्षापासून पुढे ३० वर्षापर्यंतचा करार करण्यासाठी राज्य वक्फ मंडळातर्फे राज्य शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

३० वर्षांपुढील करार करता येणार नाही. असे करार नियमबाह्य असतील, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक संस्था, दवाखान्यास सवलत

वक्फ मालमत्ता (मिळकत) भाडेतत्त्वावर देण्याचे ठरल्यास रेडीरेकनरनुसार भाडे निश्चित करावे. व्यावसायिक कामासाठी भाडेतत्त्वावर देताना रेडीरेकनरनुसारच व्यावसायिक भाड्याच्या प्रमाणात मासिक भाडे दर असणार आहे. मात्र शैक्षणिक संस्था, दवाखाने, सामाजिक कामांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचे ठरल्यास त्यांना भाडेदरात एक टक्का सवलत असणार आहे.

वक्फ मिळकत भाडेतत्त्वावर देतानाच्या अटी

वक्फ मंडळ सदस्य, व्यवस्थापन समिती सदस्य किंवा विश्वस्थांना वक्फ मिळकत भाडेतत्त्वावर देता येणार नाही. किंवा त्यांचे पती-पत्नी, भाऊ, बहीण आई- वडील, मुलांना देखील देण्यास मान्यता नाही. तसेच बेकायदेशीर कामांसाठी देखील देता येणार नाही.

टॅग्स :NashikBudget