"कोणी परदेशातून परत आले असल्यास आम्हाला तत्काळ कळवा..!'

corona 1.jpg
corona 1.jpg

नाशिक : परदेशातून नाशिकमध्ये येणारे नागरिक, पर्यटक आठवडाभराच्या अंतराने जिल्हा आरोग्य विभागाच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे प्रत्येक नाशिककराने, काळजीपूर्वक आपल्या परिचितांपैकी किंवा शेजारच्यांपैकी कोणी परदेशातून परत आला असल्यास तत्काळ जिल्हा आरोग्य यंत्रणेला कळविण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले. 

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेचे आवाहन 
नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये आतापर्यंत परदेशातून आलेले व जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे त्यांची माहिती मिळालेले 30 जण आहेत. मात्र, यांपैकी फक्त आठ जणांची माहिती शासनस्तरावरून प्राप्त झालेली आहे. उर्वरित 22 जण परदेशातून नाशिकमध्ये आल्यानंतर आठवडाभराच्या अंतराने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात आले आहेत. या 22 जणांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ लागल्यानंतर ते आरोग्य विभागाच्या संपर्कात आलेले आहेत. वास्तविक, परदेशातून आलेल्या प्रत्येकाने तत्काळ जिल्हा रुग्णालय, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे माहिती देणे आवश्‍यक आहे; परंतु अद्यापही तसे होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अशा नागरिकांनी स्वत:च्या आणि आपल्या आसपासच्या नागरिकांच्या काळजीस्तव आरोग्य यंत्रणेला माहिती कळविल्यास वेळीच त्यांची आरोग्य चाचणी घेऊन प्रतिबंध करणे शक्‍य होणार असल्याचे डॉ. जगदाळे यांनी म्हटले आहे. 

एअरपोर्ट ऍथॉरिटीकडून समन्वयाचा अभाव 
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय चाचणी विमानतळावर होते. त्यानंतर तो नागरिक राज्यातील कोणत्या शहरात जाणार आहे, त्याची माहिती तत्काळ संबंधित जिल्हा प्रशासनाकडे देणे बंधनकारक आहे. असे असतानाही एअरपोर्ट ऍथॉरिटीकडून नाशिक जिल्हा प्रशासन वा जिल्हा आरोग्य विभागाकडे फक्त एकदाच यादी प्राप्त झाली आहे. त्यामुळे एअरपोर्ट ऍथॉरिटीने परदेशातून मुंबईत येणाऱ्या राज्यातील प्रवाशांची माहिती तत्काळ दिल्यास त्यांना आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली वेळीच आणणे शक्‍य होणार आहे. मात्र, समन्वयाचा अभाव असल्याचे सध्याचे चित्र आहे. 

क्लिक करा > VIDEO :...अन् जवानाचे पॅराशूट अडकले बाभळीच्या झाडावर...मग...

ट्रॅव्हल्स संघटनेला आवाहन 
जिल्हा रुग्णालयातर्फे शहर-जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स संघटनांकडून त्यांची माहिती मागविण्यात आली आहे, तसेच परदेशातून कोणीही नागरिक त्यांच्या ट्रॅव्हल बस, कॅबमधून नाशिकमध्ये दाखल होत असेल, तर त्याची तत्काळ माहिती जिल्हा रुग्णालयास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com