
Rangpanchami 2023 : महिलांसाठी राखीव रंगपंचमीला बाऊन्सरची नियुक्ती
Nashik Rangpanchami 2023 : नाशिकमध्ये साजरी होणारी रंगपंचमी अवघ्या महाराष्ट्रासाठी विशेष आकर्षण आहे. येथे रंगपंचमीसह पेशवेकाळापासून सुरु असलेली रहाड परंपरा मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी शहरात मोठी गर्दी होते.
यंदा मात्र शहरात महिलांना रंगपंचमीचा पुरेपुर आनंद लुटता यावा यासाठी विशेष आयोजन करण्यात आले होते. यासह तेथे महिला बाऊन्सर देखील नेमण्यात आल्या होत्या. याची सर्वत्र चर्चा रंगली होती. या ठिकाणी जाण्यास तरुणांना मज्जाव असला तरी हे आयोजन पाहण्याकरिता मंडळाच्या गेटबाहेर बघ्यांची गर्दी जमली होती.
शहरातील पाटील गल्ली, गजराज चौक जुने नाशिक येथील नूतन ऐक्य मित्र मंडळातर्फे केवळ महिलांसाठी रंगपंचमीसाठी रेनडान्स अन् आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही अनुचित प्रकार घडु नये याकरिता महिला बाऊन्सर यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्तात महिलांची रंगपंचमी उत्साहात व जल्लोष साजरी करत महिलांनी आनंद लुटला खरा मात्र मंडळातर्फे केलेले हे आयोजन शहरातली नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरले.