नाशिक : केंद्राने खरीप २०२१-२२ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत मका, ज्वारी, बाजरी, रागीच्या किंमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आजपासून खरेदी केंद्रे सुरु करण्यास आणि भरडधान्याची खरेदी करण्यास अन्न-नागरी पुरवठा विभागाने मान्यता दिली आहे. राज्यात ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ही खरेदी केंद्रे सुरु राहतील.
बिगर आदिवासी भागात महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनतर्फे आणि आदिवासी भागात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे भरडधान्याची खरेदी करण्यात येते.
यंदाच्या खरीप हंगामामध्ये आधारभूत किंमतीनुसार शेतकऱ्यांना क्विंटलला खरेदी केंद्रांवर भरडधान्यांना देण्यात येणारा दर रुपयांमध्ये असा : मका- एक हजार ८७०, संकरित ज्वारी-२ हजार ७३८, मालदांडी ज्वारी-२ हजार ७५८, बाजरी-२ हजार २५०, रागी-३ हजार ३७७. दरम्यान, केंद्राने प्रलंबित असलेल्या भरडधान्य खरेदी आराखड्यास मान्यता दिली असल्याने राज्य सरकारने खरेदीचे धोरण स्वीकारले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.