दिंडोरी तालुक्यात यंदा सोयाबीन, मका, भात क्षेत्र वाढणार

Kharif Sowing
Kharif Sowingesakal

लखमापूर (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यात खरीप हंगामाला सुरवात होताच पावसाचे आगमन झाल्याने तालुक्यात खरीप हंगामाच्या तयारीची लगीनघाई सुरू असून, खरिपाची लगीनघाई दिसत आहे. मागील वर्षी सोयाबीनचे चार हजार ५७१ हेक्टर पेरणी क्षेत्र उद्दिष्ट असताना सोयाबीनने आघाडी घेत सहा हजार ६२३.८५ हेक्टर एवढे पेरणी क्षेत्राचे उद्दिष्ट पूर्ण केले. त्यामुळे यंदा सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. दिंडोरी तालुक्यात यंदा २२ हजार ७०६.४० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, मागील खरीप हंगामात २२ हजार ४७१.९३ एवढे पेरणी उद्दिष्ट पूर्ण झाले होते. (area under soybean maize and paddy is likely to increase in dindori taluka during kharif season)


मागील खरीप हंगामात सोयाबीन, मका, भात पिकांनी बाजी मारली होती; परंतु नंतरच्या काळात अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे उत्पादनांच्या सरासरीवर त्याचा परिणाम झाला होता. मोठ्या कष्टाने शेतकरी वर्गाने ही पिके वाचविली होती. दिंडोरी तालुका धरणांचा तालुका असून, पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी राहते. त्यामुळे शेतकरी भात, नागली, खुरासणी, वराई आदी पिके घेण्यावर भर देतात. सध्या मशागत कामे संपली असून, जमिनीतील ओल बऱ्यापैकी झाल्याने पेरणीची लगीनघाई सुरू झाली आहे. त्यासाठी बियाणे खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे.

Kharif Sowing
नाशिक ऑक्सिजन दुर्घटना पावसाळी अधिवेशनात गाजणार



किमती वाढल्याने शेतकरी हतबल
तालुक्यात सध्या पेरणीची लगबग सुरू असून, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी वर्ग मोठी धावपळ करीत आहे; परंतु हंगामात बियाण्यांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विविध कंपन्यांनी २५ ते २७ किलोच्या बियाण्यांच्या पिशवीमागे २५० ते ४०० रुपयांची वाढ करून बळीराजाला धक्का दिला आहे. तूर, उडीद, मुगाच्या पिशवीमागे २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या बाजारात उडदाच्या बियाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे. बाजारीच्या बियाण्यांच्या पिशवीमागे ६० ते ७० रुपयांनी वाढ झाली आहे. ऐन हंगामात बियाण्यांच्या किमती वाढल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

खरिपाचे हेक्टरनिहाय नियोजन :
१) भात - ५,५६० हेक्टर
२) नागली - १,८८९ हेक्टर
३) मका - २,१०३ हेक्टर
४) मूग - २,२५२ हेक्टर
५) उडीद - ९४१ हेक्टर
६) भुईमूग - २,६०१ हेक्टर
७) खुरासणी - ७६० हेक्टर
८) सोयाबीन - ४,५७१ हेक्टर
इतर पिके वेगळी असे एकूण २२,७०६.४० हेक्टर एवढे खरिपाचे उद्दिष्ट आहे.

(area under soybean maize and paddy is likely to increase in dindori taluka during kharif season)

Kharif Sowing
नाशिक शहरात १९२० बोगस फेरीवाले; पडताळणीतून प्रकार उघडकीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com