Swami Samarth Saptah : चंडी यागासाठी सुमारे 700 सेवेकर्‍यांचा सहभाग

Swami Samarth Saptah
Swami Samarth Saptah esakal

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशा- परदेशातील स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचं स्थळ आहे. वर्षभर भाविक येथे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येतात. (Around 700 devotees participate in Chandi Yagam during Shri Swami Samarth Week nashik news)

भक्त स्वामींची आराधना करताना
भक्त स्वामींची आराधना करतानाesakal

'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 'या त्यांच्या वचनाने अनेकांना कठीण प्रसंगातूनही पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा मिळते. यंदा श्री स्वामी समर्थांची १८ एप्रिल २०२३ रोजी पुण्यतिथी आली असून, अखंड नाम जप यज्ञ सप्ताह प्रारंभ होत आहे.

अखंड नाम जप यज्ञ सप्ताह प्रारंभाची तिथी

भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला नियमित मोठी गर्दी असते. यासोबतच महाराष्ट्रभरातील स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात.

पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून आयोजिला जातो, यंदा चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवार १८ एप्रिल २०२३ रोजी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी असून, बुधवार १२ एप्रिल २०२३ पासून सर्व मठात आणि केंद्रात श्री स्वामी समर्थांच्या सेवेत सेवेकरी अखंड नाम जप यज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला आहे.

शहरातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे व चंद्रकांत दादा यांच्या आदेशाने अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजिले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Swami Samarth Saptah
Innovation : शहरातील ‘ब्लॅक स्पॉट डिडक्शन’ शक्‍य; राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्‍निकच्‍या विद्यार्थ्यांचे यश

या सप्ताह काळात नवनाथ पारायण, अखंड स्वामीनाम जप, अखंड दोन विना वादन, अखंड दोन स्वामी चरित्र पठणासह गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, तसेच रोज नित्यस्वहाकार व त्रिकाल आरतीसह सायंकाळी टाळमृदुंगाच्या गजरात औदुंबर प्रदक्षिणा व विष्णुसहस्त्रनाम, गिताई, मनाचे श्लोक, पसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक दिंडोरी प्रणित सिन्नर स्वामी समर्थ केंद्रात सुरू आहे.

सप्ताह काळात दररोज अनेक यागांचे होम हवन सुरू असून शुक्रवारी चंडीयाग हा संपूर्ण श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. या यागात सहभाग घेतलात कुलदेवीची कृपा प्राप्त होऊन वैवाहिक व कुटुंब समस्या निवारण होते. तसेच हवन युक्त दुर्गा सप्तशती पाठ हा करण्यात आला.

या चंडीयागासाठी पुरुष व महिला अशा एकूण सुमारे 700 सेवेकर्यांनी भाग घेऊन दुर्गा सप्तशती पाठ होम हवन केले. या चंडीयागासाठी सिन्नर शहरातून तसेच तालुक्यातून अनेक महिला व पुरुष वर्ग यांनी सहभाग नोंदवला. बोल अंबा माता की जय अशा आईसाहेब यांच्या जयघोषाने श्री स्वामी समर्थ दरबार हा गजबजलेला होता. या धार्मिक कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांनी अथक परिश्रम घेतले.

सामुदायिक गुरुचरित्र पारायणासाठी 1000 सेविकाऱ्यांनी सहभाग नोंदवून उच्चांक गाठला....

दिंडोरी तालुका श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सिन्नर येथील स्वामी जयंती निमित्त नाम जप सप्ताह आयोजित करण्यात आलेला असून सप्तकाळात होम हवन यज्ञ आधी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. गुरुचरित्र वाचण्यासाठी सुमारे हजार सेवेकर्‍यांनी सहभाग नोंदवून गुरुचरित्र पारायणाचा उच्चांक नोंदविला. रोज सकाळी भूपाळी आरतीनंतर सामुदायिक गुरुचरित्र पठण करण्यात येते. सिन्नर तालुक्यातील अनेक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुचरित्र पठण सुरू असून महिला व पुरुष सेवेकरी यांनी सहभाग नोंदविला आहे.

Swami Samarth Saptah
Nashik Kala Katta : सुंदर अक्षर घडविणारे सुलेखनकार नीलेश, पूजा गायधनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com