निर्बंध शिथिल होताच घोटीत नागरिकांची तुफान गर्दी

Ghoti Market
Ghoti MarketSakal

घोटी (जि. नाशिक) : जिल्ह्यात 'ब्रेक द चेन'अंतर्गत निर्बंधांत शिथिलता आणल्‍याने गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून बंद असलेली दुकाने मंगळवारी (ता.१) खुली झाली. पहिल्‍याच दिवशी खरेदीसाठी नागरीकांनी बाजरपेठेत तोबा गर्दी केल्‍याचे दृष्य होते. लॉकडाउन अंशंत: शिथील करण्यात येताच ग्रामीण भागाची अर्थ वाहिनी समजल्या जाणाऱ्या घोटी बाजार पेठेत मुख्य रस्त्यावर काही काळ अचानक गर्दी उसळून आल्याचे पाहायला मिळाले.

ग्रामीण भागात खरीप हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करता तर खेडोपाडी असलेले छोटेखानी दुकानदार,घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे मुख्य रस्त्यावर गर्दीत वाढ झाली होती. हीच परिस्थिती बॅक,कापड दुकाने,पीठ गिरण्या, किराणामालाच्या ठिकाणी पाह्यला मिळाली. नागरिकांच्या मनात भरलेल्या धडकीने पुन्हा लॉकडाउन झाले तर अशाच चर्चा नागरिकांच्या तोडून ऐकण्यास मिळत होत्या. यातूनच अधिकचा किराणा खरेदीसाठीची मागणी करतांना काही नागरिक दिसून आले. वाढती गर्दी पाहून पोलीस व ग्रामपालिका कर्मचारी गस्त घालतांना दिसत होते. या तोबा गर्दीत कोरोनाच्या सूचनांचे पालन करतांना मास्क वापरतांना नागरिक दिसून आले. ग्रामीण भागात विविध शासन स्तरावरून कोरोना बाबत दिल्या गेलेल्या माहितीमुळे ग्रामीण भागातील नागरिक देखील सावधान झाल्याचे दिसत आहे.

(as lockdown restrictions were relaxed the citizens crowded the streets in ghoti market)

Ghoti Market
नाशिकमध्ये आजपासून निर्बंध शिथिल; वीकेंड लॉकडाउन मात्र कायम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com