आश्रमशाळांच्या  शिक्षकांना चार महिने उशिरा वेतन; आर्थिक घडी विस्कटल्याने शिक्षकांवर वाढला ताण 

Teachers Election.jpg
Teachers Election.jpg

नाशिक : आदिवासी विभागातील विविध प्रकल्पांतील अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच्या निधीची चणचण भासू लागल्याने वेतनासाठी चार महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोना विषाणू संसर्ग फैलावाच्या काळात आर्थिक घडी विस्कटल्याने शिक्षक-शिक्षकेतरांवरील मानसिक ताण वाढत चालला आहे. 

आश्रमशाळांच्या  शिक्षकांना चार महिने उशिरा वेतन

दसरा सणापासून वेतनातील उद्‍भवलेली अनियमितता दिवाळीमध्ये संपुष्टात येईल, असे वेतनासाठी पाठपुरावा करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यंत्रणेकडून सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र डिसेंबर संपला, तरीही ऑक्टोबर-नोव्हेंबरची वेतन देयके विविध प्रकल्पांत अडकून पडली आहेत. कोरोनाकाळात अनुदानित आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, खावटी अनुदानाचे सर्वेक्षण करणे आदी विविध प्रकारची प्रकल्पस्तरीय कार्यालयांनी सुचविलेली सर्व प्रकारची कामे करण्यात आली. तरीही अशा शिक्षक-शिक्षकेतरांना वेळेवर वेतन देण्याची तसदी घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 

अधिकच्या व्याजदराचा भुर्दंड सहन करण्याची वेळ
वेतन वेळेत होत नसल्याने आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली आहे. शिवाय बँकांकडून गृह व अन्य प्रकारच्या काढलेल्या कर्जाच्या हप्त्यांची नियमित परतफेड होत नाही. विम्याचे वेळेवर हप्ते देता येत नाहीत. परिणामी, अधिकच्या व्याजदराचा भुर्दंड सहन करण्याची वेळ शिक्षक-शिक्षकेतरांवर आली आहे. काही शिक्षक-शिक्षकेतरांनी प्रकल्प कार्यालयात विचारणा केल्यावर वेतन देयके मंजुरीसाठी पाठविली जातात, मात्र सी.एम.पी. होत नाही, अशी माहिती दिली जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com